पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध या ठिकाणी 21 ते 27 मे 2022 या कालावधीत होणार आहे.
ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी व स्पर्धा संचालक उमेश दळवी आणि नाना वाळके यांनी सांगितले की, स्पर्धेत अहमदाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये स्मित उंडरे, राम मगदूम, आर्यन किर्तने, शौर्य गडदे, अनुष्का जोगळेकर, रित्सा कोंडकर, काव्या पांडे या मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रणव वाघमारे व कल्पिता जोशी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: देशभरांतून १०० खेळाडू सहभागी
गोलंदाजाला जोराने धडकला विराट, दोघेही धापकन कोसळले खाली; काळजाचा ठोका चुकवणारा Video
एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद