इंडियन प्रीमीयर लीगचा १५ हंगाम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा हंगाम अन्य हंगामांपेक्षा वेगळा असणार आहे. कारण आयपीएल २०२२ पासून (IPL 2022) अहमदाबाद आणि लखनऊ या नव्या संघांचा समावेश स्पर्धेत होत आहे. त्यामुळे आता ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यातय या हंगामापूर्वी खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडणार असून त्यासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, खेळाडूंना संघात कायम करण्याची अंतिम तारिख २० जानेवारी २०२२ होती. आता उर्वरित खेळाडूंना लिलावात उतरावे लागणार आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी (IPL 2022 Auction) एकूण १२१४ खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंचा तपशीलवार
या १२१४ खेळाडूंमध्ये २७० खेळाडू हे किमान एक तरी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले म्हणजे कॅप खेळाडू आहेत. तसेच ९०३ अनकॅप म्हणजेच अजून आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेले खेळाडू आहेत. याबरोबरच ४१ खेळाडू हे सहयोगी देशातील आहेत. त्याचबरोबर कॅप खेळाडूंमध्ये ६१ भारतीय आणि २०९ परदेशी खेळाडू आहेत.
तसेच यापूर्वी आयपीएलचा भाग राहिलेले १४३ अनकॅप भारतीय आणि ७ परदेशी खेळाडू आहेत. त्याचबरोबर ६९२ एकूण अनकॅप भारतीय खेळाडू आहेत, तर ६२ अनकॅप परदेशी क्रिकेटपटू आहेत.
तसेच देशांनुसार विभागणी करायची झाल्यास भारताचे ८९६ खेळाडू असून याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५९ खेळाडूंचा यात समावेश आहे. त्याचबरोबर अफगाणिस्ताचे २०, बांगलादेशचे ९, इंग्लंडचे ३०, आयर्लंडचे ३, न्यूझीलंडचे २९, दक्षिण आफ्रिकेचे ४८, श्रीलंकेचे ३६, वेस्ट इंडिजचे ४१, झिम्बाब्वेचे २, नामिबियाचे ५, नेपाळचे १५, ओमानचे ३ आणि अमेरिकेचे १४ खेळाडू आहेत. त्याचबरोबर भूतान, नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि युएई या देशांतील प्रत्येकी १ खेळाडूचा समावेश आहे. (1,214 players have register for IPL 2022 Player Auction)
अधिक वाचा – आयपीएलमधील अहमदाबाद संघाचे काय असेल नाव ? महत्वाची माहिती आली समोर
दोन दिवस होणार लिलाव
तसेच बीसीसीआयने माहिती दिली आहे की, हा लिलाव दोन दिवस पार पडेल. यामध्ये सर्व १० संघ वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. आत्तापर्यंत १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले आहे. त्याचबरोबर लिलावानंतर प्रत्येक फ्रांचायझीला आपला संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंनाच सामील करता येणार आहे. त्यामुळे आता लिलावात जास्तीत जास्त केवळ २१७ खेळाडूंवर बोली लागू शकते. यात जास्तीत जास्त ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.
हा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने स्पष्ट केले आहे.
व्हिडिओ पाहा – अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
संघांनी कायम केलेले खेळाडू –
चेन्नई सुपर किंग – रविंद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रीच नॉर्किया.
कोलकाता नाईट रायडर्स – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण.
पंजाब किंग्स – मयंक अगरवाल, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल
सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन, अब्दुल सामद, उम्रान मलिक
अहमदाबाद संघ – हार्दिक पंड्या, राशिद खान, शुबमन गिल
लखनऊ संघ – केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयकडून विराटला मिळणार होती कारणे दाखवा नोटीस? गांगुलीने दिले स्पष्टीकरण
जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल
बीसीसीआयकडून महत्वाची बैठक आयोजित, आयपीएल २०२२ विषयी होणार ‘हे’ निर्णय