भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडच्या संघाला कडव्या टीकेचा सामना करावा लागतो आहे. अनेक माजी खेळाडू सध्या त्यांना लक्ष्य करत येताना दिसून येत आहेत. मात्र आता अशाच एका टीकेवरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चांगलाच भडकला आहे.
इंग्लंडचाच माजी कर्णधार मायकेल वॉनने काही दिवसांपूर्वी आर्चरवर टीका केली होती. तसेच कसोटी क्रिकेटप्रति असलेल्या त्याच्या निष्ठेवरून शंका व्यक्त केली होती. मात्र हे आर्चरच्या पसंतीस पडले नसून त्याने तिखट शब्दांत वॉनला प्रत्युतर दिले आहे.
आर्चर होतोय टीकेचा धनी
जोफ्रा आर्चरला इंग्लंडच्या संघात आल्यापासूनच काही ना काही कारणाने टीकेचा सामना करावा लागत होता. माध्यमांमधून आणि माजी खेळाडूंकडून त्याच्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जायचे. नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही आर्चरने दोन कसोटी सामन्यात केवळ चार बळी पटकाविले. त्यामुळेच मायकेल वॉनने आर्चरच्या कटिबद्धतेबद्दल शंका उपस्थित केली होती.
आर्चरने घेतला समाचार
डेली मेल या वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात आर्चरने याविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “ज्यावेळी तुम्ही कटिबद्ध नाही आःत किंवा खेळण्यास लायक नाही आहात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, त्यावेळी तुम्ही तुमचे ११० टक्के देत नाही आहात असे वाटते. मला हे समजत नाही की लोकं देखील हे वाचून आपले मत ठरवतात.”
मायकेल वॉनच्या टीकेवर तो म्हणाला, “मायकेल वॉनचे मी एक आर्टिकल वाचले होते ज्यात ‘जोफ्रा आर्चरला कसोटी क्रिकेट आवडत नसेल तर इंग्लंडने पर्यायी विचार करावा.’ आमचे क्रिकेटबद्दल कधीच बोलणे झाले नाही तरीही त्यांनी असे मत मांडले. हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांना माहित नाही की मला काय आवडते. कोणती गोष्ट मला प्रोत्साहित करते.”
आर्चरच्या या सडेतोड प्रत्युतरावर मायकेल वॉन काय म्हणणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
दमदार शतकासह या कॅरेबियन फलंदाजाने विराटला सोडले मागे, फिंचची केली बरोबरी
स्वदेशी ॲप कूची क्रिकेटपटूंनाही भुरळ, अनिल कुंबळेसह अनेकांनी उघडले खाते
धर्मांतर केल्यावर माझ्या फलंदाजीमध्ये, माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफचे खळबळजनक वक्तव्य