हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील शेवटचा सामना हॅमिल्टन येथे सुरु आहे. या सामन्याच न्यूझीलंडने भारतासमोर २० षटकांत २१३ धावांचे लक्ष ठेवले आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी लौकिकाला साजेशी अशी झाली नाही. त्यात बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांनी धावांची अक्षरशह: खैरात वाटली आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादव सोडला तर सर्वच गोलंदाज महागडे ठरले आहेत.
६ पैकी ४ गोलंदाजांनी या मालिकेत ७२ चेंडूत १०० पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. यात हार्दिक पंड्याने ७२ चेंडूत सर्वाधिक १३१ धावा दिल्या आहेत.
या मालिकेतील भारतीय गोलंदाजांची कामगिरी-
हार्दिक पंड्या-
चेंडू- ७२, धावा- १३१, विकेट्स- ३
खलील अहमद-
चेंडू- ७२, धावा- १२२, विकेट्स- ४
कृणाल पंड्या-
चेंडू- ७२, धावा- ११९, विकेट्स- ४
भुवनेश्वर कुमार-
चेंडू- ७२, धावा- ११३, विकेट्स- ३
युझवेंद्र चहल-
चेंडू- ४८, धावा- ७२, विकेट्स- १
कुलदीप यादव-
चेंडू- २४, धावा- २६, विकेट्स- २
महत्त्वाच्या बातम्या-
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा
–धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम