ऍशेस मालिकेत (ashes series 2021-22) ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट (joe root) याच्यावर अनेक जण टीका करत आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन (shane watson) याने रुटची पाठराखण केली आहे. त्याच्या मते रुटवर टीका करणे थांबवले गेले पाहिजे. तत्पूर्वी, २०२१ मध्ये रुटने कसोटी क्रिकेटमध्ये १७०८ धावा केल्या होत्या आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
एका वृत्तपत्रासाठी त्याने लिहिले की, ‘मला रुटसाठी खूप वाईट वाटते. कारण, गोष्टी योजनेनुसार झाल्या नाहीत. एडिलेडच्या हिरव्या खेळपट्टीवर जेव्हा चेंडू फिरत होता, तेव्हा गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले नाही. तसेच फलंदाज देखील तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरले. संघाने सर्वोत्तम कामगिरी केली नाही. इंग्लंडवर टीका नाही केली पाहिजे. कारण, कर्णधार जो रुटने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
वॉटसनने पुढे लिहिले, ‘रुटने ऑस्ट्रेलियात कसोटी शतक केले नाही. जर कर्णधाराच धावा करत नसेल, तर ते नेतृत्व संघासाठी अधिक आव्हाने उभे करते. असे असले तरी, रुटने चांगला खेळ दाखवला. परंतु, तो आतापर्यंत मोठी धावसंख्या बनवू शकला नाही. तसेच, प्रत्यक्षात फलंदाजीमध्ये त्याच्यासाठी हे वर्ष असाधारण राहिले आहे.’
पुढे लिहताना वॉटसनने इंग्लंडच्या युवा फलंदाजांना जो रुटचे उदाहरण देऊन त्यांनीही स्वतःची रणनीती बनवली पाहिजे, असे सांगितले. तो म्हणाला की, ‘जो रुट २०१३-१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या त्याच्या पहिल्या दौऱ्यात वेगवान आणि बाउंस चेंडूवर बाद व्हायचा. त्याला सर्वोत्तम रणनीती शोधन्यासाठी एक दौरा करावा लागला. मात्र, आता तो उत्कृष्ट खेळत आहे. त्याचे स्वतःच्या खेळावर चांगले नियंत्रण आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. इंग्लंडच्या युवा फलंदाजांनी कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता सोडायचा यावर काम केले पाहिजे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ही गोष्ट चांगल्या प्रकारे करतात.’ असे वॉटसन पुढे बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
“माझ्या आयुष्यावरही चित्रपट यावा”; स्वतः हरभजनने व्यक्त केली इच्छा
“अनेकांना वाटले मी संपलो, पण मी…”; ‘त्या’ दिवसांची आठवण काढत अश्विन झाला भावूक
निवृत्तीनंतर हरभजनचे धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –