जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ज्याचा फटका भारतीय क्रिकेटला देखील बसला आहे. कोरोनामुळे देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे ही स्पर्धा देखील स्थगित करण्यात आली होती. परंतु १९ जुलैपासून प्रसिद्ध टी-२० लीग तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १९ वर्षीय फलंदाजाने धुमाकूळ घातला आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा प्रारंभ लायका कोवई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स या संघातील सामन्यापासून झाला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात १९ वर्षीय फलंदाज साई सुदर्शनने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लायका कोवई किंग्स संघाकडून खेळत असलेल्या या फलंदाजाने अवघ्या ४३ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आहे.
या सामन्यात सालेम स्पार्टन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लायका कोवई किंग्स संघाकडून गंगा श्रीधर राजू याने ३३ आणि कविनने ३३ धावांची खेळी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली होती. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या साई सुदर्शन आणि कविन यांच्यात १२१ धावांची भागीदारी झाली होती.
सुदर्शनने या दरम्यान २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तर कविन ४१ चेंडूत ३३ धावा करत बाद झाला होता. परंतु सुदर्शनने आपली तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली होती. त्याने २०२ च्या स्ट्राईक रेटने अवघ्या ४३ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ८ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार लगावले होते. या खेळीच्या जोरावर सालेम स्पार्टन्स संघाला १८ षटकात १६८ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर पावसाचे आगमन झाल्याने हा सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.(19 year old sai sudarshan cracks 43 balls 87 runs for Lyca Kovai kings in TNPL 2021)
Sai Sudarshan – 8️⃣7️⃣(4⃣3⃣)????
From JSK to LKK, the paw prints are going strong! ????#TNPL #WhistlePodu #Yellove ????????
???? – @TNPremierLeague pic.twitter.com/w6qjeNTEXf— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 19, 2021
पोरियास्वामीने बिघडवले कोवई किंग्स संघाचे समीकरण
सालेम संघाकडून १८ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या पोरियास्वामीने या सामन्याचे समीकरण बदलले. त्याने पहिल्याच चेंडूवर कोवई किंग्स संघाचा कर्णधार शाहरुख खानला धावबाद करत माघारी धाडले होते. तर पुढच्याच चेंडूवर त्याने शतक पूर्ण करण्यापासून १३ धावा दूर असलेल्या साई सुदर्शनला ८७ धावांवर माघारी धाडले होते. पोरियास्वामीने या सामन्यात ३ षटके गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने १८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. परंतु हे षटक झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले होते. जोरदार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार