---Advertisement---

वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार

On: मंगळवार, जुलै 20, 2021 3:17 PM
---Advertisement---

नियमित कर्णधार ऍरॉन फिंचच्या दुखापतीमुळे ऍलेक्स केरीला वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनविण्यात आले आहे. पहिल्या वनडेमध्ये तो संघाचे नेतृत्व करेल. ही जबाबदारी स्वीकारणारा तो ऑस्ट्रेलियाचा चौथा यष्टीरक्षक आहे. त्याच्याआधी ऍडम गिलख्रिस्ट (१७), इयान हिली (८) आणि टिम पेन (५) यांनी ऑस्ट्रेलियाच्या वनडेमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात नियमित कर्णधार फिंचला दुखापत झाली होती‌. केरी ऑस्ट्रेलियाचा एकूण २६ वा वनडे कर्णधार असेल.

ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर केरी म्हणाला, “फिंच दुखापतीतून बरा होईपर्यंत ही जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. कोणत्याही खेळात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असणे भाग्याचे असते. मला ही संधी मिळाली याचा मी आभारी आहे. फिन्ची आमचा कर्णधार आहे. जेव्हा तो पूर्ण तंदुरुस्त असेल, तेव्हा आम्ही त्याचे स्वागत खुल्या दिलाने करू.”

केरीने ऑस्ट्रेलियाकडून ४२ वनडे आणि ३३ टी२० सामने खेळले आहेत. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने बिग बॅश लीग, ऑस्ट्रेलिया-ए आणि आपल्या राज्यातील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

प्रशिक्षकांनी केले कौतुक
ऍलेक्स केरी कर्णधार बनल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनी केरीचे कौतुक करताना म्हटले, “दीर्घ कालावधीपासून ऍलेक्सने संघातील एक उत्कृष्ट नेता म्हणून व्यावसायिकता आणि शिस्त दर्शविली आहे. फिंचची दुखापत ऍलेक्सला कर्णधार म्हणून पहिला अनुभव मिळेल. इतर वरीष्ठ खेळाडूंच्या पाठिंब्याने तो एक अद्भुत कामगिरी करेल यात मला शंका वाटत नाही.”

ऑस्ट्रेलिया संघाला वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यावर आपल्या काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकून दौऱ्याची यशस्वी सांगता करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन संघ करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद १७१ धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! आज भारताचे २ वेगवेगळे संघ उतरणार मैदानात; जाणून घ्या सामन्यांविषयी सर्वकाही

क्या बात! आयर्लंडच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाजांनी चिवट झुंज देत केला ‘हा’ विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---