---Advertisement---

तुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद 171 धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे

---Advertisement---

भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौर हीने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. ती आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. आजच्याच (20 जुलै) दिवशी 6 वर्षांपूर्वी तिने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अद्वितीय कामगिरी केली होती.

भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात आजच्या दिवशी (20 जुलै) 2017 मध्ये विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरी सामना खेळला गेला होता. या सामन्यात हरमनप्रीत कौर ही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आली होती. या दरम्यान तिने 115 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 7 षटकारांच्या साहाय्याने 171 धावांची विक्रमी खेळी केली होती.

या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे हा सामना 42 षटकांचा खेळवण्यात आला होता. हरमनप्रीत कौरने जेव्हा मैदानावर पाऊल ठेवले होते. त्यावेळी भारतीय संघाच्या धावा 2 गडी बाद 35 इतक्या होत्या. मैदानावर येताच तिलाच वेदना जाणवू लागल्या होत्या. कारण तिच्या हाताच्या बोटाचे हाड सरकले होते. तसेच मांसपेशी देखील खेचल्या गेल्या होत्या. तरीदेखील तिने येताच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता.

तिने सुरुवातीच्या 50 धावा 64 चेंडूंवर केल्या होत्या. तर पुढील 26 चेंडूंवर तिने पुढच्या 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर 150 धावांचा पल्ला तिने अवघ्या 17 चेंडूंवर गाठला होता.(On this day Indian batsman harmanpreet Kaur smashed 171 knock against australia in World Cup semi final)

ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅकविलने खेळली होती 90 धावांची तुफानी खेळी 
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला 40.1 षटकात 245 धावा करण्यात यश आले होते. यामध्ये ॲलेक्स ब्लॅकविलने अवघ्या 56 चेंडूंमध्ये 90 धावांची तुफानी खेळी केली होती. या दरम्यान तिने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. तर एलिस विलानिने 58 चेंडूंमध्ये 13  चौकारांच्या साहाय्याने 75 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया संघात 6 असे खेळाडू होते. ज्यांना 10 धावा देखील करता आल्या नव्हत्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने 3 गडी बाद केले होते. तर झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले होते. हा सामना भारतीय संघाने 36 धावांनी आपल्या नावावर करत विश्वचषक 2017 च्या अंतिम सामन्यात धडक दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-
मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला लॅब्यूशेन, चेंडू मिस करताच झाला मोठा गेम, पाहा व्हिडिओ
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---