---Advertisement---

काय सांगता! ६ महिन्यात होणार २ आयपीएल स्पर्धा, पण कशा?

On: बुधवार, जुलै 22, 2020 10:41 AM
---Advertisement---

नवी दिल्ली। आयसीसीने आपली प्रतिष्ठित टी२० विश्वचषक स्पर्धा सोमवारी (२० जुलै) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु असे असली तरी बीसीसीआयला आता ६ महिन्यांच्या आत आयपीएलच्या २ मोसमांचे आयोजन करावे लागणार आहे. यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत.

खरं तर यावर्षी आयपीएलचे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शक्यता आहे, ज्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु बीसीसीआयची (BCCI) अपेक्स काऊंसिल आणि आयपीएलची (IPL) गव्हर्निंग काऊंसिल बैठकीत हे निश्चित झाले आहे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन संपवायचे आहे. यानंतर बीसीसीआयला पुढील ६ महिन्यांमध्ये आणखी एका आयपीएलचे आयोजन करावे लागेल. कारण पुढे कोणताही कालावधी (विंडो) रिक्त असल्याचे दिसत नाही.

आयसीसीने टी२० विश्वचषक २०२१ साठी ऑक्टोबर- नोव्हेंबर हा कालावधी निवडला आहे, तर यावर्षी होणारा आशिया चषकही स्थगित केला आहे. अशामध्ये आशिया चषक २०२० मध्ये न होता २०२१ मध्ये होईल. आणि या स्पर्धेसाठी सप्टेंबर महिन्याचा कालावधी एशियन क्रिकेट काऊंसिल घेऊ शकते.

याव्यतिरिक्त मे महिन्याच्या शेवटीपासून ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत इंग्लंड आणि इतर देशांमध्ये क्रिकेट खेळले जाते. अशामध्ये बीसीसीआयकडे केवळ एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी आयपीएलसाठी शिल्लक राहतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-आधीच विकल्या गेलेल्या वर्ल्डकप तिकीटांचं आता होणार तरी काय? वाचा थोडक्यात

-ऑयन मॉर्गन कर्णधार तर या खेळाडूला इंग्लंडने केले आता उपकर्णधार

-टी२० विश्वचषकानंतर या मोठ्या स्पर्धेबाबतही आयसीसी घेणार मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---