इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल)ची सुरुवात होण्यासाठी आता केवळ ६ दिवस उरले आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामाप्रमाणे या हंगामातही चाहत्यांना चौकार-षटकारांचा वर्षाव होताना दिसेल.
आयपीएल २०२०मध्ये ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, डेव्हिड वॉर्नर, टॉम बँटन, क्रिस लिन असे अनेक दमदार परदेशी फलंदाज खेळताना दिसतील. तर हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी असे भारतीय धुरंदरदेखील आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत.
जर, आयपीएल सामन्याच्या एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाविषयी बोलायचे झाले, तर हा विक्रम श्रीलंकाच्या गेलच्या नावावर आहे. त्याने एका षटकात सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर भारतीय खेळाडूंमध्ये हा विक्रम मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने केला आहे. त्याने एका षटकात ३२ धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात काही भारतीय फलंदाज रैनाच्या या विक्रमाला तोडू शकतात. या लेखात, त्याच २ भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएल २०२०मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करु शकणारे २ भारतीय फलंदाज- (2 Indian Batsman Who Can Hit Most Runs In An Over Of IPL)
२. शिवम दुबे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा यावर्षी आयपीएल सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा करु शकतो. त्याच्यात मोठ-मोठे षटकार मारण्याची क्षमता आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक ताबडतोब खेळी केल्या आहेत.
गतवर्षी दुबेने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला केवळ ४ सामने खेळायला मिळाले होते. त्यात त्याने ४० धावा केल्या होत्या. परंतु, हा खेळाडू यावर्षी आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण बूमिका निभावू शकतो.
१. हार्दिक पंड्या – मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स संघाचा दमदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा यावर्षी आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा मारु शकणारा भारतीय खेळाडू ठरू शकतो. हार्दिक मोठमोठे शॉट्स मारण्यात माहिर आहे.
त्याने आजवर आयपीएलमध्ये ६६ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ७२ चौकार आणि ६८ षटकार मारत १०६८ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १५४.८ इतका होता.
ट्रेंडिंग लेख-
-पाकिस्तानी मूळ असलेले ३ खेळाडू, जे दिसतील आयपीएल २०२०मध्ये खेळताना
-कोण आहे आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणारा अमेरिकन क्रिकेटर? जाणून घ्या ५ रोमांंचक गोष्टी
-ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या-
-सर्वाधिक चर्चेत असलेली ‘ही’ कंपनी बनली आयपीएल २०२०ची को- स्पॉन्सर
-व्हिडिओ: दुबई पोहोचताच ड्वेन ब्राव्होचे सीएसकेने केले दमदार स्वागत; दिले हे सरप्राइज…
-दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अडचणीत भर; जनतेला वेड्यात काढण्याचे लावले आरोप