ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिला टी20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला चारीमुंड्या चीत केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाचा टी20 विश्वचषकाचा हा पहिलाच अंतिम सामना होता.
त्यामुळे टी20 विश्वचषक जिंकणारी केवळ दुसरीच भारतीय कर्णधार ठरण्याची हरमनप्रीत कौरला संधी होती. मात्र भारत हा सामना पराभूत झाल्याने तिने ही संधी दवडली.
याआधी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली भारतीय पुरुष संघाने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी 2007 दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला 5 धावांनी हरवत पुरुषांच्या पहिल्या विश्वचषकावर नाव कोरले होते.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 157/5 अशी धावसंख्या उभारली होती. तर पाकिस्तानचा डाव 152 धावांवर संपुष्टात आला होता. या सामन्याच अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला होता.
यानंतर मात्र भारताच्या महिला आणि पुरुष संघाला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे.






