भारतातून असे खूप कमी खेळाडू आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाहून अधिक संघांसाठी खेळले आहेत. यादीत पाहता 9 खेळाडू आहेत, जे भारतीय संघाव्यातिरिक्त इतर संघांसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु, आशिया एलेव्हेन आणि आयसीसी वर्ल्ड इलेव्हेनसाठी खेळल्यामुळे या विशेष यादीत बऱ्याचशा भारतीय खेळाडूंचे नाव नोंदवले गेले आहे.
तसेच या 9 खेळाडूंमध्ये आशिया इलेव्हेन व्यतिरिक्त आयसीसी वर्ल्ड इलेव्हेनसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले म्हणजेच तीन संघांसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फक्त दोनच खेळाडू आहेत.
आपण पाहुयात भारताशिवाय इतर दोन संघांसाठी खेळलेले खेळाडू
राहुल द्रविड (Rahul Dravid):
भारतीय संघातील एक महान फलंदाज, ज्याला ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाते. तो आत्ता भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणूनही काम पाहत आहे. राहुल द्रविडने भारताव्यतिरिक्त एशिया इलेव्हेन आणि आयसीसी वर्ल्ड इलेव्हेनसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
राहुल द्रविडने आपल्या कारकीर्दीत 164 कसोटी सामने खेळले. त्यात त्याने 36 शतके आणि 63 अर्धशतके ठोकली आहेत. या 164 कसोटींपैकी द्रविड 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध आयसीसी वर्ल्ड इलेव्हेनकडून खेळला. त्यात पहिल्या डावात द्रविडला भोपळा घेऊन मागे परतावे लागले आणि दुसऱ्या डावात त्याला फक्त 23 धावा करता आल्या होत्या.
तर द्रविडने एकदिवसीय कारकीर्दीत 344 सामने खेळले. त्यात 12 शतके आणि 83 अर्धशतके केली आहेत. या 344 सामन्यांमध्ये 1 सामना राहुल द्रविडने 2005 मध्ये वर्ल्ड इलेव्हेन विरूद्ध एशिया इलेव्हेनसाठी खेळला होता, ज्यात द्रविडने नाबाद 75 धावा केल्या होत्या. तसेच आयसीसी वर्ल्ड इलेव्हेनसाठी तीन सामने तो खेळला, त्यात त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी 26 धावा होती आणि या संघाकडून तो एकूण 46 धावा करू शकला.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag):
भारताचा भेदक सलामीवीर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवागला ओळखले जाते. सेहवागनं भारताव्यतिरिक्त इतर दोन संघांसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सेहवागनं आपल्या कारकीर्दीत कसोटीचे 104 सामने खेळले, ज्यात त्याने 23 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत. या 104 सामन्यांमध्ये सेहवागने 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध आयसीसी वर्ल्ड इलेव्हेन संघाकडून एक सामना खेळला होता. या सामन्यात त्याने एका डावात 76 तर, दुसऱ्या डावात 7 धावा केल्या होत्या.
वनडे कारकीर्दीत सेहवाग 251 सामने खेळला आहे. त्यात त्याने 15 शतके तर 38 अर्धशतके केली आहेत. या 251 सामन्यांमध्ये सेहवागने एशिया इलेव्हेनसाठी 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यात त्याने सर्वोच्च 52 धावा काढल्या आहेत आणि पूर्ण सामन्यांमध्ये मिळून 214 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
SAvsIND, 1st Test: भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ११३ धावांनी मिळवला दणदणीत विजय
ऍशेस तर गमावली, आता लाज राखण्यासाठी होणाऱ्या सिडनी कसोटीसाठी अनुपलब्ध असेल इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज
हेही पाहा-