मॉस्को। गुरूवारपासून (14 जून) रशियात 21व्या फिफा विश्वचषकाला सुरूवात होत आहे. यासाठी मागील विश्वचषकातील एक विशेष बाब.
1 बिलीयन लोकांनी बघितला अंतिम सामना
2014 फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 1 बिलीयन लोकांनी बघितला. तर संपुर्ण स्पर्धा 3.2 बिलीयन म्हणजेच जगातील 44 टक्के लोकांनी बघितली.
ब्राझिलमध्ये झालेल्या 20व्या विश्वचषकातील हा सामना अर्जेंटिना विरूद्ध जर्मनी असा हा होता.
हा सामना जर्मनीने 1-0 ने जिंकला. या सामना मिनीटाला एकूण 1.013 बिलीयन प्रेक्षकांनी बघितला. तसेच जगात 280 मिलीयन लोकांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर हा सामना बघितला.
20 मिनीटांपेक्षा जास्त वेळ पाहणाऱ्या 695 मिलीयन प्रेक्षकांचा यात सहभाग होता.यात 2010 मधील विश्वचषकापेक्षा यात12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यावेळी ब्राझिलकडे दुसऱ्यांदा यजमान पद होते. 98,087 तास या स्पर्धेतील सामन्यांचे प्रक्षेपण झाले. 2010 मधील विश्वचषकापेक्षा यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विश्वचषकाला तीन दिवस राहिले असतानाच मेस्सीचा मोठा निर्णय
–फिफा विश्वचषक: एकाच सामन्यात चक्क 12 गोल
–फिफा विश्वचषक 2018: तिकीट खरेदीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
–रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री