तब्बल दहा वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकलेला भारतीय संघ आता टी20 मालिकाही जिंकण्यास उत्सुक आहे. भारताने 5 सामन्यांची वन-डे मालिका 4-1 अशी जिंकली आहे.
टी20 मालिका भारतच जिंकणार असे भवितव्य भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केले आहे.
‘भारत ही मालिका 2-1 अशी जिंकणार’ असे गावसकर हे स्टार स्पोर्टशी बोलताना म्हणाले आहेत.
भारताची न्यूझीलंड विरुद्धची टी20मधील कामगिरी अत्यंत वाईट आहे. आतापर्यंत भारताने न्यूझीलंड विरुद्ध 8 टी20 सामने खेळले आहेत. त्यातील फक्त दोनच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे.
2009मध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध प्रथमच दोन टी20 सामने खेळले होते. त्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारताने ही टी20 मालिका 2-0 अशी जिंकली तर रोहित सर्वाधिक टी20 सामने जिंकणाऱ्या भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येईल.
रोहितने 12 टी20 सामन्यात संघाचे नेतृत्व करताना तब्बल 11 सामने जिंकले आहेत.
भारताकडून सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने 72 सामन्यात नेतृत्व करताना 42 टी20 सामने जिंकले आहेत.
तर या यादीत भारताकडून दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने 20 टी20 सामन्यात संघाला 12 विजय मिळवून दिले आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला टी20 सामना उद्या (6 फेब्रुवारी) वेलिंगटन येथे खेळला जाणार आहे. तर उर्वरित दोन सामने 8 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारीला अनुक्रमे ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर
–टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी
–विश्वचषकाआधी गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला बसणार मोठा झटका…