बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यात मुजीब उर रेहमान आणि वफादार या खेळाडूनी कसोटी पदार्पण केले. तसे अफगाणिस्तानकडून खेळलेल्या ११ पैकी ११ खेळाडूंचे हे पदार्पणच ठरले आहे.
तरीही मुजीब उर रेहमान आणि वफादारचे पदार्पण अनेक अर्थांनी खास ठरले. याचे कारण म्हणजे २१व्या शतकात जन्माला आलेले आणि कसोटी खेळणारे ते पहिले खेळाडू ठरले आहे. मुजीब उर रेहमानची जन्मतारीख २८ मार्च २००१ आहे तर वफादारचा जन्म १ फेब्रुवारी २०००मध्ये झाला आहे.
यातील मुजीब उर रेहमान हा गेल्या ११८ वर्षांमधील पहिला असा खेळाडू ठरला आहे ज्याने कसोटी आणि प्रथम श्रेणी पदार्पण बरोबर केले आहे. मुजीब यापुर्वी १५ वनडे आणि ५ टी२० सामने खेळला आहे तसेच अ दर्जाचे २२ तर ट्वेंटी२० चे २३ सामने खेळला आहे. परंतु त्याने यापुर्वी कधीही कसोटी किंवा प्रथम श्रेणी सामना खेळला नव्हता.
कसोटी सामन्याद्वारे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो एकुण ३४वा तर गेल्या ११८ वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
देशाकडून पदार्पणाची कसोटी खेळणारा तो सर्वात दुसरा तरुण खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
–तब्बल ८७ सामन्यानंतर त्या खेळाडूची भारतीय संघात वापसी, सर्व विक्रम मोडीत