अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याच्या या कामगिरीबद्दल अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुकही केले.
या कामगिरीनंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या लोकप्रियतेत काय फरक जाणवतो किंवा ही लोकप्रियता हाताळायला अवघड जाते का याबद्दल रशीद खानने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की “फरक काही नाही. मी साधे रहाण्याचा प्रयत्न करतो आणि जसा मी पहिला होतो तसाच वागतो. दिवसेंदिवस माझ्या चाहत्यांंमध्ये वाढ होत आहे आणि मला वाटत नाही की मला काही विशेष करण्याची गरज नाही.”
तसेच त्याला जेव्हा विचारण्यात आले की भारतात जसे अव्वल खेळाडूंना मान दिला जातो तसा अनुभव अफगाणिस्तानमध्येही घेतो का? यावर रशीद म्हणाला, ” जेवढे मला माहित आहे, अफगाणिस्तानच्या अध्यक्षानंतर कदाचित अफगाणिस्तानमध्ये मी सर्वात लोकप्रिय व्यक्ती असेल.”
तसेच त्याने असेही सांगितले की विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि एमएस धोनी यांच्या विकेट आत्तापर्यंतच्या काराकिर्दीतील सर्वोत्तम विकेट होत्या.
जूनमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघात रशीद खानची निवड झाली आहे. हा सामना 14 जून ते 18 जून दरम्यान बेंगलोरला होणार आहे.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–संपुर्ण यादी- तिसऱ्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये लागल्या या खेळाडूंवर बोली
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली




