fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये १२ कोटींपेक्षा जास्त रुपये मोजूनही सुपर फ्लॉप ठरलेले दोन क्रिकेटर

2 england players bought for 10 crore in ipl but did not justify their price tag

August 7, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

दरवर्षी अनेक खेळाडूंवर आयपीएलच्या लिलावामध्ये बोली लावली जाते. या लिलावामुळे बरेच खेळाडू रातोरात लखपती होतात, तर काही खेळाडू निराश होतात. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंवर १०-१२ कोटींच्यावर बोली लावल्या जातात. आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंना अशा मोठ्या रकमेत खरेदी केले आहे.

परंतु, जेव्हा एखाद्या खेळाडूला इतकी मोठी रक्कम मिळते तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा देखील बर्‍यापैकी वाढतात. ह्याच अपेक्षांच्या ओझ्याने बर्‍याच खेळाडूंवर दडपण येतो आणि यामुळे ते प्लॉप होतात. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी महागड्या बोली लावल्या गेल्या आणि ते यशस्वी झाले.

आयपीएलमध्ये सहसा परदेशी खेळाडूंसाठी खूप महाग बोली असते, परंतु सर्वच विदेशी खेळाडू यशस्वी होत नाहीत. यावर्षी, पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला. त्याला केकेआरने १५.५ कोटींच्या रकमेसह खरेदी केले. आता तो या रकमेला साजेसा खेळ करतो का ते पाहण्यास आपण सर्व आतुर आहोत.

या लेखात तुम्हाला इंग्लंडच्या त्या २ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी आयपीएलमध्ये खूप मोठी बोली लागली, पण त्यांना त्या अनुषंगाने कामगिरी करता आली नाही.

२. बेन स्टोक्स (Ben Stokes)
२०१८ च्या आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघाने १२.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. यापूर्वी त्याने २०१७ च्या हंगामात रायझिंग सुपरगिजंट्ससाठी चांगली कामगिरी केली होती. म्हणूनच २०१८ च्या लिलावात त्याच्यासाठी खूप महागडी बोली लावण्यात आली.
परंतु, आयपीएल २०१८ चा हंगाम त्याच्यासाठी चांगला नव्हता. तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्या मोसमात बेन स्टोक्सने एकही अर्धशतक केले नाही. याशिवाय गोलंदाजीतही त्याने खास काही केले नाही. त्याशिवाय ते आयपीएल २०१९ मध्ये संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नव्हता आणि तो आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडला परत गेला होता.

१. टाइमल मिल्स (Tymal Mills)
टाइमल मिल्स या इंग्लंडच्या खेळाडूलाही आयपीएलमध्ये खूप मोठी बोली लावून आरसीबी संघाने विकत घेतले. त्याच्याकडून जबरदस्त कामगिरीची आशा होती, पण त्या अपेक्षांनुसार त्याला कामगिरी करता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आयपीएल २०१७ मधून माघार घेतल्यामुळे आरसीबीला वेगवान गोलंदाजांची गरज होती.
आरसीबी टीम मॅनेजमेंटने टाइमल मिल्ससाठी खूप महाग बोली लावली आणि १२.६ कोटींच्या रकमेसह त्यांना विकत घेतले. टाइमल मिल्स नॅटवेस्ट टी-२० ब्लास्ट आणि बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता, त्यामुळे आयपीएलमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण तो येथे फ्लॉप झाला.
त्या मोसमात त्याने आरसीबीकडून फक्त ५ सामने खेळले आणि त्याला केवळ ५ बळी मिळवता आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा

-गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर

-सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या…

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज

-४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

-आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप


Previous Post

किंग्ज इलेव्हन पंजाबचा हुकमी एक्का आहे हा क्रिकेटर; भारतीय मुलीशी केलाय साखरपुडा

Next Post

गोलंदाजांना धु- धु धूताना कसोटीत एकाच दिवशी ५०० धावा करणारे संघ

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Next Post

गोलंदाजांना धु- धु धूताना कसोटीत एकाच दिवशी ५०० धावा करणारे संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्य धाव ज्यांच्या पाचवीला पुजली गेली असे ५ क्रिकेटर

भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.