---Advertisement---

चाहत्यांची उत्सुकता शिगेला! एका वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ ५ भारतीय खेळाडूंना पुन्हा मैदानावर पाहायला मिळणार

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2020 7:11 PM
---Advertisement---

२०१९मध्ये पार पडलेल्या आयपीएल खेळाडू लिलावापासून चाहत्यांची नजर आयपीएल २०२०वर आहे. आयपीएल २०२०ची सुरुवात झाली की, प्रत्येकजण आपापल्या संघासाठी आनंद व्यक्त करताना दिसेल. आयपीएलची विशेषता ही आहे की, भारतीय संघातील अनेक दमदार खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसतात. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते आरसीबीला त्यांचा आवडता संघ मानतात. तर, एमएस धोनीचे चाहते चेन्नई सुपर किंग्सचा नारा लावतात. आपल्या संघाला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवणाऱ्या रोहित शर्माचे चाहते मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसतात.

यंदा आयपीएल पाहण्याची उत्सुकता दुप्पटीने वाढलेली दिसेल. कारण, २९ मार्च रोजी सुरु होणारा आयपीएलचा १३वा हंगाम कोरोना व्हायरसमुळे १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. त्याबरोबरच चाहत्यांचे काही आवडते भारतीय खेळाडू, जे बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. ते आयपीएलच्या १३व्या हंगामात मैदानावर खेळताना दिसतील. म्हणून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार.

या लेखात, आयपीएलद्वारे एका वर्षानंतर पुन्हा मैदानावर खेळताना दिसणाऱ्या ५ भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. 5 Indian Players Will Do Comeback In Cricket Through IPl 2020 After 1 Year

५. सुरेश रैना –

आयपीएलमध्ये सर्वप्रथम ५००० धावा पूर्ण करणारा सुरेश रैना हा एका वेळेला भारतीय संघाचा मधल्या फळीतील प्रमुख भाग होता. मात्र, जुलै २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर, रैनाला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर रैनाचे चाहते त्याला फक्त आयपीएलद्वारे खेळताना पाहतात. परंतु, आयपीएलच्या १२व्या हंगामापासून जवळपास एक वर्ष झाले, रैना क्रिकेट खेळताना दिसला नाही. त्यामुळे यंदा रैनाच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार.

बऱ्याच वर्षांपासून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये शीर्ष स्थानावर असणाऱ्या रैनाच्या नावावर सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम आहे. रैनाने २००८ ते २०१९ दरम्यान सर्वाधिक १९३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५३६८ धावा केल्या आहेत. तसेच, ३३.३४ फलंदाजी सरासरी असणाऱ्या रैनाने आयपीएलमध्ये एक शतकही ठोकले आहे. सोबतच रैनाने २५ विकेट्सही चटकावल्या आहेत.

४. रॉबिन उथप्पा –

कर्नाटकचा रॉबिन उथप्पा २००६ साली इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला होता. उथप्पाला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. पण, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर अशा दिग्गजांमुळे त्याला भारताकडून क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पण, उथप्पाच्या देशांतर्गत प्रदर्शनामुळे त्याच्यातील क्षमतेवर कोणीही शंका करु शकत नाही.

त्याने गेल्या काही वर्षात एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समध्ये निवड झाल्यामुळे उथप्पा पुन्हा आपल्या प्रदर्शनाने कमाल करत दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल. उथप्पादेखील जवळपास एक वर्षे झाले क्रिकेट खेळताना दिसला नाही.

उथप्पाने आतापर्यंत १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २८.८३च्या सरासरीने ४४११ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक ८७ धावांचा समावेश आहे. सोबतच यष्टीरक्षण करताना उथप्पाने ८४ झेल आणि ३२ यष्टीचीत विकेट्स घेतल्या आहेत.

३. अंबाती रायडू –

चेन्नई सुपर किंग्स संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने आयपीएल २०१८मध्ये प्रशंसनीय प्रदर्शन केले होते. मात्र, हा फलंदाज गतवर्षी आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरला नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या वृत्तामुळे रायडू चर्चेत होता. पण त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुन्हा क्रिकेटमध्ये आगमन करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रायडूने पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५५ धावांची शानदार खेळी केली होती. तब्बल ७ हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर रायडू चेन्नई सुपर किंग्स संघात सामील झाला. २०१८च्या संपूर्ण हंगामात रायडूने १६ सामने खेळत ६०२ धावा केल्या होत्या. गतवर्षी त्याला आयपीएलमध्ये जास्त चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे एका वर्षानंतर रायडूला मैदानावर जबरदस्त प्रदर्शन करताना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असणार.

२. दिनेश कार्तिक –

भारतीय संघाच्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २७.०७च्या सरासरीने ३६५४ धावा केल्या आहेत. केवळ ३ धावांमुळे त्याचे आयपीएल शतक हुकले होते. त्यामुळे त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या ९७ इतकी आहे. गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळलेल्या दिनेशने यष्टीरक्षण करताना १०९ झेल आणि ३० यष्टीचीत विकेट्स घेतल्या आहेत.

दिनेश २०१९सालच्या विश्वचषकानंतर चाहत्यांना मैदानावर खेळताना दिसला नाही. त्यामुळे एका वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे, हा फलंदाज क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे दिनेशला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, तर त्याला आयपीलच्या तेराव्या हंगामात शानदार प्रदर्शन करावे लागेल. तो यंदा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.

१. एमएस धोनी –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एमएस धोनी याने २०१९मधील विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेले नाही. धोनीच्या शानदार फलंदाजीला आणि त्याच्या उत्कृष्ट नेतृत्त्वाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये १९० सामने खेळलेला धोनी आयपीएलमध्ये २००पेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रम करु शकतो. त्याने आयपीएलमध्ये १९० सामने खेळत ४४३२ धावा केल्या आहेत. तर, यष्टीरक्षण करताना त्याने ९८ फलंदाजांना झेलबाद आणि ३८ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

त्याबरोबरच धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला ३ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. गतवर्षी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या विजेतेपदाचा स्वाद चाखू दिला नाही. त्यामुळे धोनी यंदा त्याच्या नेतृत्त्वाखाली चौथ्यांदा ट्रॉफी जिंकत मुंबई इंडियन्सची बरोबरी करेल का?, हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतील.

ट्रेंडिंग लेख –

कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये ‘या’ ५ खेळाडूंनी केल्यात सर्वाधिक धावा; गेलच्या आसपासही नाही कुणी

आयपीएल इतिहासात एकदाही विजेता ठरला नाही ‘हा’ संघ, यंदा या ४ कारणांमुळे होऊ शकतो विजेता

आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या – 

गांगुलीच्या निवृत्तीनंतर युवराजला कसोटीत मिळाली होती संधी पण यामुळे संपली कसोटी कारकीर्द

युजवेंद्र चहलचा झाला साखरपूडा! सोशल मीडियावर शेअर केले फोटो

हार्दिकच्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी कृणाल पंड्याने सुरु केली तयारी; शेअर केला हा खास विडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---