मुंबई । हार्दिक पंड्याच्या आयुष्यात सध्या मुलाचे आगमन झाल्यापासून खूप आनंद आहे. त्याची पार्टनर नताशा स्टॅनकोव्हिच हीने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. यामुळे हार्दिकच नव्हे तर संपूर्ण कुटुंब मुलाच्या आगमनाने खूप आनंदित असल्याचे दिसते. क्रिकेटपटू कुटुंबात जन्मलेला हा मुलगा अष्टपैलू व्हावा अशी चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तो एक महिन्याचा होण्यापूर्वीच कृणाल पंड्याने आपल्या पुतण्याला टिप्स द्यायला सुरुवात केली आहे.
हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हार्दिकच्या नवजात मुलाला हातामध्ये घेऊन त्याच्याबरोबर बोलत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कृणालने लिहिले आहे की, ‘चला क्रिकेटबद्दल बोलूया.’ कृणाल पंड्या आणि हार्दिक दोघेही अष्टपैलू आहेत. जेव्हा हार्दिकने मुलाच्या जन्माची गोड बातमी दिली तेव्हा चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘भारतीय संघाला एक नवीन अष्टपैलू खेळाडू सापडला आहे.’
https://twitter.com/krunalpandya24/status/1291316040119406593
नताशा आणि हार्दिक मुलासमवेत घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण घर सजलेले दिसले होते. कृणाल पंड्याची पत्नी पंखुरीनी घरात पाळणा लावला आणि निळ्या रंगाने सजावट केली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. पंखुरीने कृणालसह आणि हार्दिकच्या मुलाचे एक छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले होते, “या वेड्या घरात तुझे स्वागत आहे. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो.”
https://www.instagram.com/p/CDYKRQ2BiRY/
कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान नताशा हार्दिक पंड्याच्या कुटुंबासमवेत राहत होती. मे महिन्यात कुटुंबांनी या जोडप्यासाठी ‘बेबी शॉवर’चे आयोजनही केले होते. लॉकडाऊन दरम्यान या जोडप्याने आपले रोमँटिक फोटोही शेअर केले होते. हार्दिक आणि नताशाने एक खास फोटोशूट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलला टायटल स्पॉन्सर्सशिप देण्याबद्दल जिओने घेतला हा निर्णय
-आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका
-आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही
-४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं
-जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता






