आयपीएलचा १३ वा मोसम येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होत आहे. मात्र या मोसमासाठी चीनी मोबाईल कंपनी विवोने मुख्य प्रायोजकत्व (टायटल स्पॉन्सरशिप) देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विवो कंपनीने भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांच्या टायटल स्पॉन्सरशिपच्या करारातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या या मोसमासाठी नवीन टायटल स्पॉन्सरशिपच्या शोधात बीसीसीआय आहे. पण यासाठी सध्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत.
पण मागील काही दिवसात जिओ टायटल स्पॉन्सरशिप देणार असल्याचे म्हटले जात होते. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी सायंकाळी एका अधिकाऱ्याने आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपमध्ये जिओच्या स्वारस्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधीला विचारले.
परंतु मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधीने “ते (जिओ) असे कोणत्याही असोसिएशनचा शोध घेत नाहीत,” असे सांगत ही ऑफर नाकारली.
याबरोबरच अशीही चर्चा आहे की बीसीसीआयने पेटीएम आणि बायजू यांच्यासारख्या विविध कॉर्पोरेट कंपन्यांना एसओएस पाठविला आहे, परंतु त्यापैकी कोणीही यात रस दाखवलेला नाही.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की “या सर्व कंपन्या बीसीसीआयच्या भागीदार आहेत. ते सर्व भारतीय संघटना आहेत परंतु आम्हाला अँटी- चीन कॉन्ट्रॉन्टच्या भांडवलाबद्दल चिंता आहे. त्यापैकी कोणी जर पुढे आले तर लोक काय प्रतिक्रिया देतात याचा अंदाज बांधू इच्छित नाही.’
यावर्षी २९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला होता. पण आता हा मोसम युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. यादरम्यान अबुधाबी, दुबई आणि शारजाह या तीन ठिकाणी सामने होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात
चालू क्रिकेट सामन्यातच खेळाडू व प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव, क्रिकेट पुन्हा धर्मसंकटात
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे केन विल्यमसन
अजब इतिहास! कर्णधाराने शुन्यावर डाव घोषीत करुनही संघाला मिळवून दिला होता विजय
जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?





