---Advertisement---

फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला

---Advertisement---

आयपीएल चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण बीसीसीआय १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यास सज्ज झाली आहे. आयसीसीने टी२० विश्वचषक २०२० स्थगित केल्यामुळे बीसीसीआयने यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेता, खेळाडूंसहित सपोर्ट स्टाफच्या सुरक्षिततेचा निश्चित करून कठोर नियमांतर्गत ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे.

केवळ २४ खेळाडूंसोबतच प्रवास करू शकतात संघ

यूएईच्या धरतीवर उतरण्यापूर्वी खेळाडूंना कमीत कमी ५ कोरोना व्हायरसच्या चाचणीतून जाण्याची अपेक्षा आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत हाही निर्णय घेतला की, प्रत्येक फ्रंचायझी संघ अधिकतर २४ खेळाडूंसोबतच यूएईचा प्रवास करू शकतो. आयपीएल फ्रँचायझीने खरेदी केलेल्या जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन परिषदेने हा निर्णय आयपीएल लिलाव २०२० मध्ये घेतला होता.

३ फ्रंचायझी संघांवर उद्भवली समस्या

२४ खेळाडूंसोबत स्पर्धेत प्रवेश करण्याच्या निर्णयाने फ्रंचायझींवर थोडंस संकट आले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघांनी मागील वर्षी आयपीएल खेळाडूंच्या लिलावात २५ खेळाडूंना निवडले होते. त्यांना स्पर्धेत आपल्या १ खेळाडूला वगळावे लागणार आहे.

३ फ्रंचायझी संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

किंग्ज इलेव्हन पंजाब-

ख्रिस गेल, मयंक अगरवाल, करुण नायर, सर्फराज खान, मनदीप सिंग, शेल्डन कॉटरेल, इशान पोरेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंग, हार्डज विलोजेन, एम अश्विन, जे सुचित, हरप्रीत बराड, दर्शन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, ख्रिस जॉर्डन, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, तजिंदर सिंग ढिल्लन, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरण, प्रभसिमरन सिंग,

सनरायझर्स हैद्राबाद-

केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, फेबियन एलेव्हन, विजय शर्मा, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, बावनका संदीप, बासिल थंपी.

राजस्थान रॉयल्स-

महिपाल लोमरोर, मनन वोहरा, रियान पराग, स्टिव्ह स्मिथ, रॉबिन उथप्पा, डेव्हिड मिलर, अंकित राजपूत, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण ऍरॉन, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशेन थॉमस, अँड्र्यू टाय, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शशांक सिंग, यशस्वी जयस्वाल, अनिरुद्ध जोशी, टॉम करन, जॉस बटलर, संजू सॅमसन, अनुज रावत.

हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की या ३ संघातील फ्रंचायझी कोणत्या खेळाडूला संघातून वगळतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

-सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार

-आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका

-आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही

-४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं

-जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---