नवी दिल्ली| ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. शुक्रवारी साऊथॅम्प्टन मैदानावर या दोन संघात पहिला टी -२० सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडकडून अत्यंत रोमांचक सामन्यात २ धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला. मात्र, सोशल मीडियावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ जबरदस्त ट्रोल झाला.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान आरसीबीच्या ट्रोलमागील कारण म्हणजे युवा फिरकीपटू अॅडम झाम्पाची गोलंदाजी. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना साऊथॅम्प्टन मैदानावर 7 गडी गमावून 162 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जोस बटलरने 44 आणि डेव्हिड मालनने 66 धावा केल्या तर दुसरा कोणताही फलंदाज चालू शकला नाही.
त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 4 षटके गोलंदाजी टाकली आणि 11.75 च्या सरासरीने तब्बल 47 धावा दिल्या आणि तो बळी घेण्यात अपयशी ठरला. त्याच्या या खराब कामगिरीमुळे आरसीबी संघाला ट्रोल व्हावे लागले. तो आरसीबी संघात आयपीएल २०२० साठी आहे.
Kane Richardson 3-12-2
Adam Zampa 4-47-0
RCB effect in full Force 😂😂😭— AA (@cricketfreak009) September 5, 2020
Kane left RCB: 3 – 0 – 13 – 2
Zampa joined RCB: 4 – 0 – 47 – 0Power of @RCBTweets 💡 pic.twitter.com/IGVyE1Ket7
— Symbiote ! (@iamGurooot) September 5, 2020
Kane Richardson 3-12-2
Adam Zampa 4-47-0
RCB effect in full Force 😂😂😭— AA (@cricketfreak009) September 5, 2020
Zampa enrolling himself into the RCB fold for IPL pic.twitter.com/9d6YFh33dI
— MI புத்தன் (@narengiri2) September 5, 2020
There was a joke going on that Adam Zampa won't be picking regular wickets now as he got picked by THE RCB and it turned out to be pretty true! #AUSvENG
— Shekhar Singh (@Shekharsingh219) September 5, 2020
रिचर्डसनच्या जागी अॅडम झाम्पा आरसीबी संघात दाखल झाला आहे
यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलसाठी आरसीबीच्या संघात केन रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाचा समावेश आहे.
यामुळे केन रिचर्डसन आयपीएल खेळू शकणार नाही
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केन रिचर्डसनने 3 षटकांत 3.33 च्या इकॉनॉमीने 13 धावा देऊन दोन बळी घेतले. रिचर्डसनने डेव्हिड मालन आणि टॉम करन यांचे बळी घेतले. रिचर्डसन 2016 च्या आयपीएल हंगामात आरसीबीकडून खेळला. यावेळी 2020 च्या लिलावात केन रिचर्डसनला पुन्हा एकदा आरसीबीने 4 कोटींमध्ये खरेदी केले होते.
पण केन रिचर्डसन लवकरच वडील होणार आहे आणि त्याला आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. या कारणास्तव, त्याने या आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले. त्याच्या माघारीनंतर अॅडम झाम्पाचा आरसीबीने संघात समावेश केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आयपीएल 2020 च्या खेळाडूंच्या लिलावावेळी अॅडम झाम्पा विकला गेला नव्हता. यावेळी त्यांची आधारभूत किंमत दीड कोटी रुपये होती.
आरसीबीची संपूर्ण टीम खालीलप्रमाणे आहे.
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पदीकल, पार्थिव पटेल, आरोन फिंच, जोशुआ फिलिप, शाहबाज अहमद, गुरकीतसिंग मान, पवन देशपांडे, मोईन अली, शिवम दुबे, ख्रिस मौरिस, इसरू उदाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, अॅडम झाम्पा, डेल स्टेन.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा
आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर चाहत्यांना झाले धोनीचे दर्शन; सीएसकेची सरावाला सुरुवात
६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय
आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी