fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

Anderson said his natural built and hard work has helped him stretch his career

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

अँडरसनची कारकीर्द इतकी लांब कशी झाली, इंग्लिश वेगवान गोलंदाजाने स्वत: केले हे रहस्य उघड.
कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनल्यावर इंग्लंडचा जेम्स अँडरसन पुढच्या वर्षी होणाऱ्या ऍशेस मालिकेवर लक्ष ठेवून आहे. अशावेळी ऑस्ट्रेलियात खेळण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे तो म्हणाला.

अँडरसनने 2003 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि आतापर्यंत 17 वर्षात 156 कसोटी सामने खेळले आहेत. नुकत्याच पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने 600 वा बळी घेतला.

अँडरसन म्हणाला की त्याच्या सडपातळ शरीर आणि परिश्रमांमुळे आतापर्यंत त्याची कारकीर्द इतकी मोठी करण्यास मदत झाली. तो म्हणाला, ‘यासारखे शरीर मिळविणे माझे भाग्य आहे. मी नैसर्गिकरित्या पातळ शरीराचा आहे, ज्यामुळे मला मदत झाली. मी जिममध्ये खूप मेहनत घेतली. जर मी दुखापतींपासून दूर राहिलो तर मी आणखी काही काळ खेळू शकेन.’

पुढील ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान खेळली जाणार आहे.

बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणाऱ्या संघात सामील होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझी बळी घेण्याची भूक पूर्वीसारखीच राहिली आहे. मला अजूनही सामने खेळायला आवडतात, त्यामुळे मी माझा खेळ सुधारण्याचा आणि तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत राहीन.”

या 38 वर्षीय खेळाडूने सांगितले की, जर तो बळी घेत राहिला तर त्याला ऍशेस संघात निवड होण्याची संधी मिळेल. अँडरसन म्हणाला, “जर येत्या काही महिन्यांत मी बळी घेत राहिलो तर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाण्याची संधी मिळेल अशी मला मनापासून आशा आहे.”

पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी अँडरसनने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अझर अलीला बाद करून आपला 600 वा बळी घेतला. याआधी मुथय्या मुरलीधरन (800 विकेट), शेन वॉर्न (708) आणि अनिल कुंबळे (619) हे तीन फिरकी गोलंदाजांनी 600 कसोटी बळीचा टप्पा पूर्ण केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण

सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,

-२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

ट्रेंडिंग लेख-

-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा


Previous Post

इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण

Next Post

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@Media_SAI
कुस्ती

Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी

April 18, 2021
Next Post

हॉटेलची रुम नीट नसल्याने व धोनीशी वाद झाल्याने रैना दुबईतून भारतात परतला?

चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.