fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमुळे बीसीसीआय अडकलीय संकटात, युएई सरकारपुढे रगडतेय आपले नाक

BCCI Stuck In UAE Covid-19 Protocols

September 2, 2020
in Covid19, IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात व्हायला जवळपास २ आठवडे उरले आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय मोठ्या संकटात सापडले असल्याचे दिसत आहे. युएईतील कठोर कोरोना व्हायरस नियम बीसीसीआयपुढील संकटाचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत. BCCI Stuck In UAE Covid-19 Protocols

भारतातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता आयपीएल २०२०चे युएईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. अशात दुबई, अबु दाबी आणि शारजाह या ३ ठिकाणी हे आयपीएल सामने होणार आहेत. पण, अबु दाबी शहरातील कोरोना व्हायरसच्या नियमांमुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. परिस्थिती अशी उद्भवली आहे की, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणारी बीसीसीआय युएई सरकारला कोरोना व्हायरसच्या नियमांमध्ये थोडी सूट देण्याची विनंती करत आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, आयपीएल गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि सीईओ हेमंग अमीन हे सध्या युएईमध्ये आहेत. ते तिथे शारजाह, दुबई आणि अबु दाबीच्या सरकारला कोरोना व्हायरसच्या नियमांमध्ये सूट देण्याची विनंती करत आहेत.

युएई सरकारच्या कोरोना व्हायरस नियमांपैकी एक नियम असा आहे की, जर कोणताही व्यक्ती दुबईवरुन अबु दाबीला जाणार असेल. तर त्याची सीमारेषेवर कोरोना चाचणी करण्यात येईल. यासाठी जवळपास अडीच तास लागतील. त्यानंतर त्या व्यक्तीला अबु दाबीमध्ये ४८ तासांच्या आत आपला कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल.

अशात जर आयपीएल खेळाडूंवरही हा नियम लागू करण्यात आला. तर, विराट कोहलीच्या आरसीबी आणि एमएस धोनीच्या सीएसके संघांना दुबईवरुन अबु दाबीला जाण्यापुर्वी दुबईच्या सीमेवर लाइनमध्ये उभा राहून आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. म्हणून बीसीसीआयचे अधिकारी युएई सरकारशी आयपीएलमधील खेळाडूंची त्यांच्या हॉटेलमध्ये चाचणी करण्याची परवानगी देण्याविषयी चर्चा करत आहेत.

आयपीएलची सुरुवात होण्यापुर्वीच अनेक संकटे उद्भवत असल्याचे दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघातील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे अजूनही आयपीएल कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नाही. अशात माध्यमातील वृत्तांनुसार, आयपीएलच्या एका फ्रंचायझी अधिकाऱ्याला आयपीएल रद्द होण्याची भिती वाटत आहे.

“मुद्दा हा आहे की, बीसीसीआयला आयपीएल रद्द करायचे असेल तर त्यांनी आजच करावे. बीसीसीआय १५ दिवसांनंतर आयपीएल रद्द करु शकत नाही. सर्व संघ युएईमध्ये आहेत आणि सर्वांनी संघावर खूप पैसा खर्च केला आहे. सर्व आयपीएल संघांनी आपापल्या खेळाडूंना केवळ आयपीएलसाठी बोलावले आहे. अशात त्यांना त्यांचे पैसेदेखील द्यावे लागणार. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत की. तुम्ही सामने खेळले नाहीत. तर आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार,” असे बोलताना त्या फ्रंचायझी अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम

१०वी नापास भारतीय क्रिकेटर, ज्याने वयाच्या केवळ २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आणली होते नाकी नऊ

रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत हे ३ परदेशी खेळाडू

आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा


Previous Post

किती ही संकटे! बीसीसीआयच्या संकटात अजून पडली नवी भर, कुणीही घेईना पुढाकार

Next Post

ब्रेकिंग- अखेर खरे कारणं आले समोर, रैनाचा आयपीएलवर अप्रत्यक्ष निशाणा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

ब्रेकिंग- अखेर खरे कारणं आले समोर, रैनाचा आयपीएलवर अप्रत्यक्ष निशाणा

Photo Courtesy: Twitter/ IPL

रैनाच्या गैरहजरीत गंभीरचा धोनीला सल्ला, म्हणतोय आता तू...

Photo Courtesy: Twitter/IPL

'सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही', दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.