मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूट हा खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत नेतृत्व करण्यास तयार असल्याचे उपकर्णधार बेन स्टोक्सने म्हटले आहे.
जो रूट हा दुसऱ्यांदा वडील होणार असल्याने तो पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर संघात सामील होण्यापूर्वी रुटला आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
बेन स्टोक्सने डेली मीररमध्ये लिहिलेल्या त्याच्या स्तंभात म्हटले आहे की, “आमचा कर्णधार जो रूट पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या घरी दुसरा नवीन पाहुणा येणार आहे. उपकर्णधार या नात्याने मला जबाबदारी घ्यावी लागेल.”
तो म्हणाला, “कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेल्या क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमधील 13 आठवडे आनंद -दु:खाच्या चढउतारा सारखे होते.”
मागील वर्षी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने शानदार खेळी करत इंग्लंड संघाला पहिल्यांदा विश्वविजेता बनवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
सचिन तेंडुलकरने दिला आयसीसीला सल्ला, जर चेंडूला लाळ लावता येणार नसेल तर…
आफ्रिदीला कोरोनाची लागण होताच गौतम गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
मूळचे राजस्थानचे असलेले सोलंकी ‘या’ संघाला देणार क्रिकेटचे धडे