मुंबई । भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. 2018 साली त्याने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर तो संघात पुन्हा स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला. संघात पुनरागमन करण्यासाठी रैनाची धडपड सुरू आहे.
यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगच्या मते, रैनाचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण विराट कोहली युवा खेळाडूंना संधी देत आहे.
वनडे क्रिकेटचा विचार केला तर श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर योग्य आहे. या स्थानावर पूर्वी रैना खेळत होता. अशा परिस्थितीत रैनाला जागा बनवणे कठीण आहे. यावर तो म्हणाला, “मला वाटते रैनाला संधी मिळणार नाही. जर तुम्ही आत्ताच भारतीय लाइन अप बघितले तर यावेळी विराट कोहली रैनाला कोणत्या जागेवर संधी देईल. तो याक्षणी तरूणांवर नजर ठेवून आहे. आणि श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे.”
त्याशिवाय रैनाची आता संघात कोणतीही भूमिका नसल्याचेही हॉगने म्हटले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉग म्हणाला, “मी त्याला फलंदाजीच्या खालच्या क्रमांकावर पाहत नाही. जो तीन किंवा चार क्रमांकावर येतो आणि मधल्या षटकांत फलंदाजी करतो. मला वाटत नाही की आता भारतीय क्रिकेटमध्ये त्याची कोणतीही भूमिका आहे. ”
तो म्हणाला, ” सुरेश रैनाला भारताकडून सर्वात कमी स्वरूपात खेळण्याची संधी मिळाली आहे. संघात परतण्यासाठी यावर्षी त्याला आयपीएलच्या मंचावर धमाका करावा लागणार आहे. तसेच रैनाला सामावून घेण्यासाठी भारताला शिखर धवनला बाहेर काढावे लागणार आहे. टी -20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिखर धवनला संघाबाहेर ठेवावे लागेल. परंतु रैना पुन्हा खेळताना मला दिसणार नाही आणि हे सांगणे थोडे निराशाजनक आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या-
–ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय क्रिकेटर म्हणजे तर साक्षात रिकी पॉटींगच
–खुशखबर! क्रिकेटमधील धमाल लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
–कोरोनामुळे ४ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अडकलेला क्रिकेटर अखेर वेस्ट इंडिजला रवाना