मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएल हंगाम 2020 चे वेळापत्रक सोमवारी जाहीर झाले. लीगची सुरुवात 18 ऑगस्टपासून होईल. पहिला सामना गयाना अमेजन वॉरियर्स आणि ट्राईनबागो नाइट रायडर्स यांच्यात होईल. या लीगचा अंतिम सामना 10 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
या लीगमध्ये त्रिनिदादा आणि टोबॅगो या देशातील दोन मैदानांमध्ये 33 सामने खेळले जातील. तारोबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अॅकॅडमीमध्ये अंतिम सामना आणि उपांत्य फेरीसह 23 सामने आयोजित केले आहे. त्याचबरोबर उर्वरित 10 सामने पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळले जातील.
जैव सुरक्षित वातावरणात रिकाम्या स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जातील.सहभागी खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम
ट्रेंडिंग लेख-
-सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
-पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती