---Advertisement---

लोकं धोनीचे पोस्टर जाळत होती, पण धोनीने तो फोटोही शेअर करुन उदाहरण घालून दिले

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 9:45 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने इंस्टाग्रामवरुन भावूक करणारा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये ‘मै पल दो पल का शायर हूँ’ हे धोनीचं आवडतं गाणं वाजत आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीने त्याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक आठवणी चाहत्यांसमोर मांडल्या आहेत. या व्हिडिओमध्ये २००७ च्या विश्वचषकानंतर लोकांनी त्याचे फोटो आणि पोस्टर जाळल्याचा एक फोटोही त्याने टाकला आहे. २००७ च्या कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषकात भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या विश्वचषकात भारत साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. या विश्वचषकात धोनीही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत होता.

पण या विश्वचषकात झालेल्या भारताच्या पराभवानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेक क्रिकेटपटूंच्या घरावर दगडफेक झाली होती. अनेकांचे पोस्टर जाळण्यात आले होते. यात धोनीच्याही पोस्टरचा समावेश होता. धोनीने त्या विश्वचषकात केवळ ३ सामन्यात केवळ २९ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरही लोकांचा राग व्यक्त होत होता.

https://www.instagram.com/p/CD6ZQn1lGBi/

या घटनेची आठवण म्हणून धोनीने त्याच्या निवृत्तीच्या व्हिडिओतही या घटनेचा फोटो टाकला आहे. याव्यतिरिक्त धोनीने तो पदार्पणाच्या सामन्यात आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धावबाद झाल्याचा फोटो, त्याच्या संघसहकाऱ्यांबरोबरील फोटोही शेअर केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---