कोणताही खेळ असला तरी प्रत्येक तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या भावना त्या खेळाशी जोडलेल्या असतात. बऱ्याचदा खेळाडू त्या भावना दाखवून देत नाही, तर काही खेळाडू त्यांच्या भावना अनेकदा रोखू शकत नाहीत. त्यामुळे चाहत्यांना काही वेळा खेळाडू जसे चिडलेले दिसतात, तसेच अनेकदा भावूक होतानाही दिसतात.
भारतात क्रिकेटला तर धर्माचा दर्जा दिला जातो. क्रिकेटचाहते आपल्या आवडीच्या खेळाडूंना अगदी देव मानायलाही कमी करत नाहीत. मात्र, अनेकदा अशा घटना घडल्या ज्यावेळी क्रिकेटपटूंना आपल्या भावना आवरणे कठीण होते आणि क्रिकेटपटू भर मैदानात रडताना असताना आपण पाहिले आहेत
आज अशाच ५ घटनांविषयी जाणून घेऊया, ज्यावेळी या क्रिकेटपटूंना आपल्या भावना अनावर झाल्या.
५) विनोद कांबळी
१९९६ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात, कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारत व श्रीलंका आमने सामने होते. श्रीलंकेने २५१ धावांचे आव्हान भारताला दिले. भारताने फॉर्मात असलेल्या सचिन तेंडुलकरच्या खेळीमुळे शानदार सुरुवात केली होती. सचिन वैयक्तिक ६५ धावांवर बाद होताच भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. २ बाद ९८ वरून भारताची अवस्था ८ बाद १२० अशी झाली.
भारत हरणार हे माहीत झाल्यावर प्रेक्षकांनी स्टॅंडमध्ये गोंधळ घालायला व जाळपोळ करायला सुरुवात केली. शेवटी, पंच सामनाधिकारी क्लाइव्ह लॉईड यांनी श्रीलंकेला सामना बहाल केला.
या सर्वांमध्ये, मैदानात हजर असलेला भारताचा फलंदाज विनोद कांबळी अत्यंत दुखी झाला. मैदानातून पव्हेलियनकडे परतत असताना तो आपले अश्रू लपवत होता.
२) हरभजन सिंग व युवराज सिंग
२००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. तेव्हा तरुण असलेले युवराज व हरभजन भारतीय संघाचा भाग होते. आठ वर्षानंतर, २०११ मध्ये मायदेशात झालेल्या विश्वचषकात भारताने विजय संपादन केला.
एमएस धोनीने विजयी षटकार मारतच संपूर्ण संघ मैदानात दाखल झाला. यादरम्यान, हरभजन व युवराज हे सचिन तेंडुलकरच्या गळ्यात पडून रडत होते. त्यांचे आनंदाश्रु पाहून सर्व क्रिकेटप्रेमी देखील भावनिक झाले.
३) विराट कोहली
२०१२ टी२० विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. पाकिस्तान विरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. तरीही, उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला द. आफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवायचा होता.
मात्र, भारत तो सामना अवघ्या एका धावेने जिंकु शकला. उपांत्य फेरीत जाण्याची आशा संपुष्टात आल्याने, सबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला आपले अश्रू अनावर झाले.
४) कुलदीप यादव
एखाद्या फलंदाजाने गोलंदाजांच्या गोलंदाजीवर जास्त धावा काढल्या तर त्या गोलंदाजाला वाईट वाटणे सहाजिक आहे. मात्र, गोलंदाज रडलेले क्वचित दिसते.
२०१९ आयपीएल दरम्यान आरसीबीचा फलंदाज मोईन आली याने केकेआरचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या एका षटकात २६ धावा ठोकल्या. षटक संपल्यानंतर, कुलदीप यादव निराश झाल्यामुळे भर मैदानात ओक्साबोक्शी रडत होता.
५) सचिन तेंडुलकर
२४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर २०१३ मध्ये सचिन आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर अखेरचा सामना खेळला. वेस्ट इंडीज विरुद्ध त्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांना जाणीव झाली की सचिनचा काळ संपला आहे.
संपूर्ण मैदानाला फेरी मारल्यानंतर, खेळपट्टीचे दर्शन घेऊन, ड्रेसिंग रूमकडे जाताना, सचिन आपले डोळे पुसत असलेला सर्वांना पाहिला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो सर्वात भावनिक क्षण होता.
ट्रेंडिंग लेख –
भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्य धाव ज्यांच्या पाचवीला पुजली गेली असे ५ क्रिकेटर
गोलंदाजांना धु- धु धूताना कसोटीत एकाच दिवशी ५०० धावा करणारे संघ
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्ज इलेव्हन पंजाबचा हुकमी एक्का आहे हा क्रिकेटर; भारतीय मुलीशी केलाय साखरपुडा
४७० मिनीटं पीचवर तळ ठोकून त्याने २४ वर्ष जुना विक्रम मोडला
‘या’ फलंदाजाच्या प्रायवेट पार्टला २ वेळा लागला होता वसीम अक्रमचा चेंडू, माफी मागत शेअर केला व्हिडिओ