---Advertisement---

इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

On: मंगळवार, जुलै 28, 2020 8:05 PM
---Advertisement---

मँचेस्टर| इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात आज(२८ जुलै) पाचव्या दिवशी इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ३ सामन्यांची कसोटी मालिका यजमान इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली.

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा दुसरा डाव ३७.१ षटकात १२९ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त जर्मेन ब्लॅकवूड(२३), शाम्राह ब्रूक्स(२२), क्रेग ब्रेथवेट(१९) आणि कर्णधार जेसन होल्डर(१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

इंग्लंडकडून या डावात ख्रिस वोक्सने सर्वाधिक ५ तर स्टुअर्ट ब्रॉडने ४ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.

तत्पूर्वी या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इंग्लंडकडून ऑली पोप(९१), रॉरी बर्न्स(५७), जॉस बटलर(६७) आणि स्टुअर्ट ब्रॉड(६२) यांनी अर्धशतके झळकावत पहिल्या डावात इंग्लंडला ३६९ धावसंख्येपर्यंत पोहचवले. या डावात वेस्ट इंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात सर्वबाद १९७ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर शेन डावरिचने ३७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे वेस्ट इंडिज फॉलोऑन वाचवण्यात यशस्वी ठरले. पण ते १७२ धावांनी पिछाडीवर होते. इंग्लंडकडून या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावाची सुरुवात रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्लेने शानदार केली. या दोघांनी ११४ धावांची सलामी भागीदारी रचली. सिब्ले ५६ धावांवर बाद झाल्यानंतर रुटने बर्न्सची साथ दिली. बर्न्स ९० धावांवर बाद झाला. तर रुट अर्धशतक करताना नाबाद ६८ धावा केल्या. इंग्लंडने हा डाव २ बाद २२६ धावसंख्येवर घोषित करत पहिल्या डावातील १७२ धावांच्या आघाडीसह वेस्ट इंडिजला ३९९ धावांचे आव्हान दिले होते. या डावात वेस्ट इंडिजकडून होल्डर आणि रोस्टन चेसने प्रत्येकी १ विकेट घेतली.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पार पडलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. तर पुढील दोन सामने इंग्लंडने जिंकून ही मालिकाही जिंकली.

तिसरा कसोटी सामना – संक्षिप्त धावफलक 

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद ३६९ धावा

वेस्ट इंडिज पहिला डाव – सर्वबाद १९७ धावा

इंग्लंड दुसरा डाव – २ बाद २२६ धावा (घोषित)

वेस्ट इंडिज दुसरा डाव – सर्वबाद १२९ धावा

सामनावीर – स्टुअर्ट ब्रॉड (पहिला डाव – ३१/६, दुसरा डाव – ३६/४ आणि ६२ धावा)

मालिकावीर – स्टुअर्ट ब्रॉड (१६ विकेट्स आणि ७३ धावा)

महत्त्वाच्या बातम्या –

२०२३ विश्वचषकासाठी आयसीसीने केली सुपर लीग टूर्नामेंट लाँच; भारताव्यतिरिक्त हे संघ करणार क्वालिफाय

कसोटी क्रिकेट खेळलेल्या ३०१३ फलंदाजांमध्ये असा नकोसा विक्रम आज झाला क्रेग ब्रेथवेटच्या नावावर

५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने केले आहे तब्बल एवढ्या फलंदाजांना क्लिन बोल्ड

ट्रेंडिंग लेख –

खलनायक ते नायक!

गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….

६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---