साऊथँम्पटन। आज(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून कर्णधार ओएन मॉर्गनने तुफानी शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
मॉर्गनने आज ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांसह १०६ धावा केल्या. आता त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून २१५ षटकार झाले आहेत. त्यामुळे तो आता भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३२ सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना २११ षटकार मारले आहेत. तर मॉर्गनने आत्तापर्यंत १६३ आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करताना २१५ षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे हे दोघेच कर्णधार आहेत. धोनी आणि मॉर्गन व्यतिरिक्त कोणत्याही कर्णधाराला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा अधिक षटकार मारता आलेले नाही.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधरांच्या यादीत मॉर्गन आणि धोनीच्या पाठोपाठ १७० षटकारांसह रिकी पाँटिंग आहे.
आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार –
२१५ – ओएन मॉर्गन
२११ – एमएस धोनी
१७१ – रिकी पाँटिंग
१७० – ब्रेंडन मॅक्यूलम
१३५ – एबी डिविलियर्स
१३४ – ख्रिस गेल
१३२ – सौरव गांगुली
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या ३ आयपीएल हंगामात रिषभ पंतच ठरलाय हिरो, जाणून घ्या काय आहे कारण
बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन