आयपीएल ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम मंच आहे. या हंगामात मुबईचा युवा फलंदाज ईशान किशन, पंजाबचा युवा फिरकीपटूं रवि बिष्णोई या खेळांडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 20 वर्षीय सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्या कामगिरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शनिवारी (३ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ६३ धावा ठोकल्या. यामध्ये १ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. या अर्धशतकासोबत त्याने आयपीएलच्या पदार्पणात सर्वात जलद 3 वेळा 50 पेक्षा अधिक धावा ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
याबाबतीत त्याने गौतम गंभीर, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज फलंदाजांना त्याने मागे टाकले आहे.
मागील हंगामात आरसीबी संघाचा भाग असूनही त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या हंगामात त्याने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकले.
भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने याआधी आयपीएलमध्ये 5 डावात 3 वेळा 50 पेक्षा अधिक धावा ठोकल्या होत्या. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श आणि वेस्टइंडिज संघाचा फलंदाज लेंडन सिमन्स यांनीही 5 डावात 3 वेळा 50 पेक्षा अधिक धावा ठोकण्याचा कारनामा केला होता.
आयपीएलमध्ये या हंगामात आरसीबीने खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयात देवदत्त पडिक्कलने मोलाची कामगिरी बजावली आहे.
पडिक्कलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४३.५० च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये कमी डावांमध्ये ३ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
४* डावात- देवदत्त पडिक्कल
५ डावात- रोहित शर्मा
५ डावात- गौतम गंभीर
५ डावात- शॉन मार्श
५ डावात- लेंडल सिमन्स