क्रिकेट जगतासाठी दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लिश काउंटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेले ग्रॅहम काउड्रे यांचं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण समजले नाही. परंतु माध्यमातील काही वृत्तांनुसार ते काही काळापासून आजारी होते.
काउड्रे (Graham Cowdrey) यांनी इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. परंतु ते आपल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध होते. ते मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज होते.
कुटुंबाचे क्रिकेटशी नाते
काउड्रे यांच्या संपूर्ण कुटुंबाने इंग्लंड क्रिकेटची सेवा केली. त्यांचे वडील लॉर्ड काउड्रे आणि भाऊ ख्रिस काउड्रेनेही इंग्लंड संघाचे नेतृत्त्व केले होते. ग्रॅहम यांचे आजोबा आणि भाचे यांनीही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
काउड्रे यांची कारकीर्द
काउड्रे यांनी केंट संघाकडून खेळताना १७९ प्रथम श्रेणी सामने आणि २६१ अ दर्जाचे सामने खेळले. यात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३४.७३ च्या सरासरीने ८८५८ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्यांनी १७ शतके आणि ४६ अर्धशतके ठोकली होती. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही १४७ इतकी होती.
याव्यतिरिक्त अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी २६.१० च्या सरासरीने ५१४२ धावा केल्या. या धावा करताना त्यांनी ३ शतके आणि २४ अर्धशतकेही कुटली होती. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद १०५ इतकी होती.
अशाप्रकारे त्यांनी एकूण २० शतकांच्या मदतीने तब्बल १४ हजार धावा ठोकल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोच रवी शास्त्री अध्यक्ष गांगुलीचे नाव विसरले की जाणून बुजून घेतलं नाही?
-खराब चपला धुवत असताना विराट कोहली कॅमेरात कैद; अनुष्का म्हणाली, ‘दौऱ्यावर जाण्या अगोदर…’
-टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू उतरणार विशेष जर्सीत, कारण आहे खूप खास