---Advertisement---

राष्ट्रीय कर्तव्यानंतर पंड्या पित्याच्या भूमिकेत व्यस्त, शेअर केला गोंडस फोटो

On: शनिवार, डिसेंबर 12, 2020 10:23 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या शनिवारी (१२ डिसेंबर) मायदेशात परतला. त्यामुळे जवळपास चार महिन्यांनंतर तो आपला मुलगा अगस्त्यला भेटला आहे. नुकताच पंड्याने अगस्त्यसोबतचा आपला एक गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असल्याचे दिसत आहे.
पंड्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये पंड्या हातात लहान मुलांना दुध पिऊ घालण्याची बॉटल घेऊन बसलेला दिसत आहे. त्याने मांडीवर अगस्त्यला झोपवले आहे आणि तो त्या बॉटलने अगस्त्यला दुध पाजतो आहे. या फोटोला पंड्याने ‘राष्ट्रीय कर्तव्य ते पित्याचे कर्तव्य’ असे अप्रतिम कॅप्शन दिले आहे.

https://twitter.com/hardikpandya7/status/1337735839573549061?s=20

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी पंड्या व त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिच हे आई-वडील बनले होते. मात्र आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग असल्यामुळे पंड्याला आपल्या मुलासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर तो युएईवरुनच भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका पार पडल्यानंतर तो मायदेशात परतला आहे.

पंड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत कमालीचे प्रदर्शन केले आहे. त्याला त्याच्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर बोलताना पंड्या त्याचे कुटुंब आणि त्याच्या लहान मुलाला मिस करत असल्याचे सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

शुभमंगल.! प्रेयसीने टाकलेल्या गुगलीवर पडली फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची विकेट; विवाहाचे फोटो व्हायरल

भारताविरुद्ध कुठल्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार; ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजाची प्रतिक्रिया

…म्हणून भारताने ऍडलेडमध्ये गुलाबी चेंडू सराव सामना खेळू नये, आकाश चोप्राने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---