भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होईल. नियोजित वेळापत्रकानुसार, 17 ते 21 डिसेंबरदरम्यान ऍडलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल. या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर ‘भारत अ’ आणि ‘ऑस्ट्रेलिया अ’ या दोन संघात तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने खराब कामगिरी केली. त्याला दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूने तंबूचा रस्ता दाखवला.
पृथ्वी शॉ ठरला ‘फ्लॉप’
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. भारताच्या दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करणाऱ्यांची पुन्हा निराशा झाली. दुसऱ्या डावातही तो अवघ्या 19 धावा करून तंबूत परतला.
कॅमरॉन ग्रीनने केली उत्कृष्ट कामगिरी
मात्र, आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेला युवा अष्टपैलू गोलंदाज कॅमरॉन ग्रीन याच्या कामगिरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ग्रीनने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 125 धावांची नाबाद खेळी केली आणि भारतीय संघावर 59 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यात मोलाची कामगिरी बजावली.
पृथ्वी शॉ याला सापळा रचून केले बाद
कॅमरॉन ग्रीनने गोलंदाजीतही कमाल केली. भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना त्याने तंबूचा मार्ग दाखवला. पृथ्वी शॉ (19 धावा) याला सापळा रचून त्याने झेलबाद केले. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1336111997532966913?s=21
पहिल्या डावात रहाणेचे शतक
पहिल्या डावात, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद 117) आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (54 धावा) यांनी उत्कृष्ट खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघाने 247 धावांवर डाव घोषित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत
धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल