रविवारी (१८ ऑक्टोबर) अबू धाबी येथे आयपीएलचा ३५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना बरोबरीत सुटला होता. पंरतु कोलकाताने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. कोलकाताचा हा पाचवा विजय होता. सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकत कोलकाताने तब्बल ११ वर्षांनंतर एक कारनामा केला आहे.
नाणेफेक जिंकत हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघानेही निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६३ धावाच केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताने ३ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.
या विजयासह त्यांनी मागील ११ वर्षांनंतर पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. यापूर्वी त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये खेळताना पराभवाचा सामना केला होता. त्याचबरोबर २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळतानाही त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.
आयपीएलमध्ये कोलकाताने खेळलेले सुपर ओव्हर सामने
२००९- पराभव विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२०१४- पराभव विरुद्ध राजस्तान रॉयल्स
२०१९- पराभव विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२०२०- विजय विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद*
महत्त्वाच्या बातम्या-
-ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का
-सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी
-सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या