आयपीएल २०२० मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याने तो किमान १ आठवडा खेळू शकणार नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन आता शिमरॉन हेटमायरला अंतिम अकरामध्ये सामील करू शकतात.
पर्याय म्हणून कोणताही भारतीय यष्टीरक्षक नसल्यामुळे दिल्ली संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हेटमायरच्या जागी ऍलेक्स कॅरेला संघात सामील केले होते. यादरम्यान डावाच्या शेवटी दिल्ली संघाला आपले आक्रमक फलंदाज पंत आणि हेटमायरची कमतरता भासली. कारण फलंदाज शिखर धवनला नाबाद ६९ धावांची खेळी करण्यासाठी ५२ चेंडूंचा सामना करावा लागला होता.
याबद्दल माहिती देताना आयपीएलच्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, “दिल्ली कॅपिटल्स संघाने स्कॅन रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडिकल टीमला पाठवला आहे. कारण बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंच्या बाबतीत असे करणे बंधनकारक आहे. यावरून समजते की पंतला झालेली दुखापत ही ग्रेड एकची आहे.”
पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाचे संतुलन बिघडले. कारण त्यांनी आपले दोन आक्रमक फलंदाज गमावले आहेत. दिल्लीच्या सध्याच्या फलंदाजी फळीत आक्रमक अष्टपैलू ललित यादव हा पंतचा एकमेव पर्याय आहे. त्याने देशांतर्गत टी२० सामन्यात ३० सामन्यात १३६.९१ च्या स्ट्राईक रेटने ४०८ धावा केल्या आहेत.
ऍलेक्स कॅरे यष्टीरक्षक म्हणून प्रबळ दावेदार आहे. परंतु ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ३० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने १७६ धावा केल्या आहेत. यात त्याने केवळ ६ षटकार ठोकले आहेत.
पंतने आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएल हंगामात ६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १७६ धावा केल्या आहेत.
दिल्ली संघ आपला आठवा सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात ते कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर
-श्रेयस अय्यरसाठी रिषभ पंत ठरतोय अनलकी बॅटिंग पार्टनर? जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
-दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष
-असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
-IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत