इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत आयपीएलमध्ये हवे तसे यश मिळवता आले नाही. विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाला तब्बल ३ वेळा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले आहे. पण, यंदाचा आरसीबी संघ हा खूप मजबूत असल्याचे दिसत आहे.
यंदा आरसीबी संघात विराट कोहलीसह एबी डिविलियर्स, क्रिस मॉरिस, आरोन फिंचसारखे मॅच विनर खेळाडू उपलब्ध आहेत. तर, पार्थिव पटेल, युझवेंद्र चहल यांच्यासारखे दमदार भारतीय खेळाडूही गेल्या काही वर्षांपासून संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यांच्याव्यतिरिक्त सध्या आरसीबी संघात अशा खेळाडूची भरती करण्यात आली आहे, जो आपल्या फलंदाजीने संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता राखतो. हा खेळाडू म्हणजे, देवदत्त पड्डिकल. Royal Challengers Bangalore Batsman Devadutt Padikkal’s Performance
२० वर्षीय युवा खेळाडू पड्डिकल हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील कर्नाटकचा संघाचा दमदार सलामीवीर फलंदाज आहे. पड्डीकलच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीला पाहता, आरसीबीने यावर्षी पुन्हा त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.
पड्डीकल आयपीएलच्या १२व्या हंगामात आरसीबीचा भाग होता. पण, विराटने पूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. पण, पड्डिकलने सप्टेंबर २०१९मध्ये विजय हजारे ट्रॉफीदरम्यान अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एवढेच नव्हे तर, पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने ११ सामने खेळत ६०९ धावा ठोकल्या. त्याच्या या अफलातून प्रदर्शनामुळे कर्नाटक संघाने गतवर्षी विजय हजारे ट्रॉफी पटकावली.
५० षटकांच्या अ दर्जाच्या क्रिकेटसह पड्डिकलने २० षटकांच्या क्रिकेट प्रकारातही आपली कमाल दाखवली. त्याने २०१९सालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ५८० धावा करत कर्नाटक संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळे आयपीएल २०१९मध्ये जरी विराटने त्याला संधी दिली नसली. तरी, तो यंदा मात्र पड्डीकलला नक्कीच आरसीबीच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देईल, अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर…
बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव नाकारात कॅप्टन कूल धोनीने घेतला धाडसी निर्णय
आयपीएलमध्ये गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ सर्वात मोठे आव्हान, मोहम्मद शमीने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे