fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदार्पणाच्या वर्षातच संघाला एक नव्हे तर दोन ट्रॉफी दिल्या जिंकून, आता तोच खेळाडू बनवेल विराटच्या आरसीबीला विजेता

Royal Challengers Bangalore Batsman Devadutt Padikkal's Performance

September 9, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आतापर्यंत आयपीएलमध्ये हवे तसे यश मिळवता आले नाही. विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाला तब्बल ३ वेळा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले आहे. पण, यंदाचा आरसीबी संघ हा खूप मजबूत असल्याचे दिसत आहे.

यंदा आरसीबी संघात विराट कोहलीसह एबी डिविलियर्स, क्रिस मॉरिस, आरोन फिंचसारखे मॅच विनर खेळाडू उपलब्ध आहेत. तर, पार्थिव पटेल, युझवेंद्र चहल यांच्यासारखे दमदार भारतीय खेळाडूही गेल्या काही वर्षांपासून संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यांच्याव्यतिरिक्त सध्या आरसीबी संघात अशा खेळाडूची भरती करण्यात आली आहे, जो आपल्या फलंदाजीने संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता राखतो. हा खेळाडू म्हणजे, देवदत्त पड्डिकल. Royal Challengers Bangalore Batsman Devadutt Padikkal’s Performance

२० वर्षीय युवा खेळाडू पड्डिकल हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील कर्नाटकचा संघाचा दमदार सलामीवीर फलंदाज आहे. पड्डीकलच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीला पाहता, आरसीबीने यावर्षी पुन्हा त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.

पड्डीकल आयपीएलच्या १२व्या हंगामात आरसीबीचा भाग होता. पण, विराटने पूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. पण, पड्डिकलने सप्टेंबर २०१९मध्ये विजय हजारे ट्रॉफीदरम्यान अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एवढेच नव्हे तर, पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने ११ सामने खेळत ६०९ धावा ठोकल्या. त्याच्या या अफलातून प्रदर्शनामुळे कर्नाटक संघाने गतवर्षी विजय हजारे ट्रॉफी पटकावली.

५० षटकांच्या अ दर्जाच्या क्रिकेटसह पड्डिकलने २० षटकांच्या क्रिकेट प्रकारातही आपली कमाल दाखवली. त्याने २०१९सालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक ५८० धावा करत कर्नाटक संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळे आयपीएल २०१९मध्ये जरी विराटने त्याला संधी दिली नसली. तरी, तो यंदा मात्र पड्डीकलला नक्कीच आरसीबीच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देईल, अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर… 

बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव नाकारात कॅप्टन कूल धोनीने घेतला धाडसी निर्णय

आयपीएलमध्ये गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ सर्वात मोठे आव्हान, मोहम्मद शमीने केला खुलासा

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे


Previous Post

या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण

Next Post

युजवेंद्र चहलने केले ‘युनिवर्सल बॉल’ ख्रिस गेलला ट्रोल म्हणाला, अंकल काय….

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and iplt20.com
IPL

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Next Post

युजवेंद्र चहलने केले 'युनिवर्सल बॉल' ख्रिस गेलला ट्रोल म्हणाला, अंकल काय....

आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज

आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला 'हा' खेळाडू विकायचा पाणीपुरी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.