इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान पहिला टी -20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पहिल्या टी-20 मध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 16.1 षटकांत 6 गडी गमावून 131 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सलामीवीर टॉम बंटनने 71 धावांची प्रभावी खेळी केली. जरी पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला तरी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खान त्याच्या टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 50 बळी पूर्ण करण्यात यशस्वी झाला.
शादाब खान टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक बळी मिळवणारा पाकिस्तानचा 7 वा गोलंदाज ठरला. पहिल्या टी -20 मध्ये शादाबने 4 षटके टाकली आणि 33 धावा देऊन 2 बळी घेतले. पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 98 बळी घेतले आहेत. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 107 बळी घेतले आहेत.
मोईन अलीला असे केले बाद
पहिल्या टी -20 मध्ये इंग्लंडचा फलंदाज मोईन अली 8 धावा करुन स्पिनर शादाब खानचा बळी ठरला. यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेऊन मोईनला तंबूचा मार्ग दाखविला. इंग्लंडचा फलंदाज मोईन 14 व्या षटकात बाद झाला. ज्या चेंडूवर फलंदाज बाद झाला त्याच्या अगोदरच्या चेंडूवर रिझवानने शादाबला सांगितले होते की, “याला उर्दू येते. स्वतः याला फसवून बाद करावे लागेल.”
रिझवानने बरेच काही बोलल्यानंतर शदाबने पुढचा चेंडू मोईनला ऑफ साइडच्या बाहेर फेकला, खेळण्यासाठी फलंदाजाने चूक केली आणि यष्टीच्या मागे रिझवानने हवेत उडी मारली आणि एक कठीण झेल पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किंबहुना, रिझवानने जाणीवपूर्वक फलंदाजाचे लक्ष वेधण्यासाठी यष्टी मागून स्लेज केले, रिजवानचा मुद्दा ऐकून मोईल अली भटकला आणि बॉल बाहेर जात असताना बॅटने अडवला.
Mohammad Rizwan to Shadab Khan when Moeen Ali was batting "isko yeh khud hi karna, isko Urdu samajh aati hai” (think for yourself what to bowl, I won't tell you, as he understands Urdu) #ENGvPAK pic.twitter.com/H1d0UU44ju
— Abubakar Saqib (@AbubakarSaqib3) August 29, 2020
मालिकेचा दुसरा टी -20 सामना 30 सप्टेंबरला आणि शेवटचा सामना 1 सप्टेंबरला खेळला जाणार आहे.कसोटी मालिकेत इंग्लंडने पाकिस्तानला 1-0 ने पराभूत करून मालिका जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?
-जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना
ट्रेंडिंग लेख-
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून