---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपसाठी नवीन नियम लागू; भारताला झाला तोटा

On: गुरूवार, नोव्हेंबर 19, 2020 9:57 PM
---Advertisement---

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप कोविड-१९ महामारीमुळे काही काळ बंद होती. आता, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निवडण्यासाठी‌ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नवीन नियमांवर शिक्कामोर्तब केले आहे. अंतिम फेरीत स्थान मिळण्यासाठी संघ सहभागी झालेल्या सामन्यांची व‌ त्यात मिळवलेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.

गुणांची टक्केवारी घेतली जाईल विचारात
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देताना सांगितले की, “चॅम्पियनशीपमध्ये सहभागी असलेल्या नऊ संघानी आतापर्यंत खेळलेल्या आणि त्यात मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीचा सारासार विचार करून अंतिम दोन संघ निवडले जातील.”

अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने या नवीन नियमांना हिरवा कंदील दाखवला आहे.

गुण वाटून घेण्याच्या निर्णयावर झाली होती असहमती
आयसीसीची यावर्षीची अखेरची तिमाही बैठक आज संपन्न झाली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ महामारीमुळे खेळल्या न गेलेल्या सामन्यांना अनिर्णित मानून त्यातील अंक वाटून देण्याचा पर्याय सुचवला गेला. मात्र, अनेक सदस्यांनी त्याला नकार दिल्याने हा पर्याय मागे पडला.

नवीन गुणपद्धतीने भारताला झाला तोटा
नवीन गुणपद्धती लागू होण्यापूर्वी भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वलस्थानी होता. मात्र, गुणांच्या टक्केवारीचा नियम लागू झाल्याने भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. याआधी २९६ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने अव्वल स्थान काबीज केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे तीन मालिकेतील ९ सामन्यातून ८२.२ टक्के, तर भारताने चार मालिका खेळून १३ सामन्यात ७५.० टक्के गुण मिळवले आहेत.

९ संघांमध्ये खेळवली जात आहे चॅम्पियनशीप
जागतिक क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये, कसोटी क्रमवारीतील पहिले नऊ संघ दोन वर्षात सहा मालिका खेळतात. प्रत्येक मालिकेत जास्तीत जास्त १२० गुण मिळवता येतात. चॅम्पियनशीपमध्ये अव्वल राहणारे दोन संघ जून २०२१ मध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळतील.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट नाही, तर ‘या’ भारतीय फलंदाजाची विकेट अधिक मूल्यवान, भारताविरुद्धच्या सामन्याआधी हेझलवूडचे वक्तव्य

कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज

कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव

ट्रेंडिंग लेख-

…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात

हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश

पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---