आयपीएल २०२०चा तेरावा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून केवळ अंतिम सामना उरला आहे. तत्पूर्वी अबु धाबीमध्ये रविवारी (८ नोव्हेंबर) क्वालिफायर २ सामना झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सच्या हातून लाजिरवाणा पराभव झाला. त्यामुळे हैदराबादचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. यानंतर हैदराबादच्या केन विलियम्सनने आपले मत मांडले आहे.
अंतिम सामन्यात न पोहोचणे लज्जास्पद
विलियम्सन सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, “आम्ही अंतिम सामन्यात पोहोचू शकलो नाही, हे लज्जास्पद आहे. परंतु गेल्या तीन आठवड्यात आमच्या संघाने ज्याप्रकारे प्रदर्शन केले. त्याला पाहता सर्वांना आमचा अभिमान वाटला पाहिजे. आम्ही बऱ्याच सामन्यात खूप कमी फरकाने पराभूत झालो. कदाचित चांगल्या क्षेत्ररक्षणात आम्ही कमी पडलो. या स्पर्धेमध्ये सर्वजण चांगले खेळले. पण विजेता बनण्यासाठी टॉप क्लास खेळीची गरज असते.”
गर्ग आणि समदचे केले कौतुक
तसेच पुढे बोलताना विलियम्सनने प्रियम गर्गला सलामीला पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, “प्रियम खूप प्रतिभाशाली खेळाडू आहे. तो सराव करताना खूप चांगले शॉट्स मारत असतो. तो नक्कीच भविष्यात मोठा खेळाडू बनेल. तसेच अब्दुल समदनेही अंतिम षटकात दमदार फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला होता. परंतु, तो अजून जास्त वेळ मैदानावर टिकायला हवा होता.”
विलियम्सनची दिल्ली-हैदराबाद सामन्यातील कामगिरी
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादपुढे १९० धावांचे आव्हान ठेवले होते. त्यांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना विलियम्सनने हैदराबादकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४५ चेंडूत ६७ धावांची आक्रमक खेळी केली होती. यात त्याच्या ५ चौकारांचा आणि ४ षटकारांचा समावेश होता. परंतु तो डावातील १७व्या षटकात बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाजांना जास्त चांगली खेळी करता आली नाही. परिणामत: हैदराबादने १७ धावांनी सामना गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! सनरायझर्स हैदराबादचा ‘यॉर्करकिंग’ बनला ‘बापमाणूस’
…आणि ‘असा’ निर्णय घेणारा सनरायझर्स हैदराबाद ठरला पहिलाच संघ
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ