रविवारी (१८ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या आयपीएल २०२०च्या ३५व्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेला हा सामना बरोबरीत सुटला होता. परंतु कोलकाताने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
हैदराबादने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या कोलकाताने २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानीवर १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादनेही २० षटकात ६ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा अंतिम निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २ विकेट्सच्या नुकसानीवर २ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोलकाताने सहज ३ धावा केल्या आणि २००९ नंतर पहिल्यांदाच सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
हैदराबादकडून फलंदाजी करताना वॉर्नरने ३३ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश होता. तसेच कोलकाताच्या १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेयरस्टोने ३६ धावा, केन विलियम्सनने २९ धावा आणि अब्दुल समदने २३ धावा केल्या.
कोलकाताकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने ४ षटके टाकत केवळ १८ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त पॅट कमिन्स, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीनेही हैदराबादच्या प्रत्येकी एक फलंदाजाला मैदानाबाहेर पाठवले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून शुबमन गिलने ३७ चेंडूत ५ चौकार लगावत सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या, तर कर्णधार ओएन मॉर्गननेही २३ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त नितीश राणा (२९ धावा), दिनेश कार्तिक (२९ धावा) व राहुल त्रिपाठीनेही (२३ धावा) धावा केल्या.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर विजय शंकर, बसील थम्पी आणि राशिद खाननेही प्रत्येकी एक विकेटची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
-ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का
-सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी
-सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या