भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला तिसर्या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या धक्क्यातून भारतीय संघ सावरत असतानाच भारतीय संघासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला.
शमीला झाली होती दुखापत
पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू हातावर लागल्याने, शमी फलंदाजी करू शकला नव्हता. शमी दुखापतग्रस्त झाल्याने भारताला आपला डाव ३६ धावांवर घोषित करावा लागला. त्यानंतर, शमी गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने शमीची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले होते.
वृत्तसंस्थेने दिली माहिती
एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, शमीच्या हाताची दुखापत गंभीर आहे. दवाखान्यात हाताचे स्कॅन केल्यानंतर समोर आले आहे की, शमीच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. सोबतच, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी देखील ट्विट करत याविषयी माहिती दिली.
Ind vs Aus: Mohammad Shami out of series with fractured arm
Read @ANI Story | https://t.co/eigEzBrVBY pic.twitter.com/akRIN1lejP
— ANI Digital (@ani_digital) December 19, 2020
भारताच्या अडचणीत झाली वाढ
शमी मालिकेतून बाहेर झाल्याने भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार आहे. भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटीसाठी उपलब्ध नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा देखील दुखापतीमुळे मालिकेतून आधीच बाहेर गेला आहे. आता, शमी बाहेर पडल्याने भारताची वेगवान गोलंदाजी काहीशी कमजोर वाटते. भारताकडे आता जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी व मोहम्मद सिराज हे चार वेगवान गोलंदाजी पर्याय शिल्लक आहेत.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत विराटने दिली माहिती, म्हणाला;
– IND Vs AUS: दिवसरात्र कसोटी सामन्यात फाटके शूज घालून शमी करतोय गोलंदाजी, फोटो व्हायरल






