सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी कुतूहल असते. त्यांचे नाव आणि आकर्षणामुळे ते स्वतःच समाजात एक ब्रँड बनतात. आणि लोक आंधळेपणाने त्यांचे अनुसरण करतात. त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आचरण, माध्यमांमधील प्रतिमेमुळे त्यांच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ला हातभार लागतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅन्ड्स (आयआयएचबी) यांनी केलेल्या सर्वेक्षणात विराट कोहली, एमएस धोनी, सानिया मिर्झा, अनुष्का शर्मा यांचे नाव अग्रस्थानी आहे.
जपानी संस्थेने केला अभ्यास
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या टीआयएआरए (विश्वास, ओळख, आकर्षक, आदर आणि आकर्षण ) संशोधनाने “सेलिब्रिटीज एस ह्युमन ब्रँड्स” या कल्पनेवर विस्तृत अभ्यास केला आहे. हे एक अद्वितीय संशोधन आहे ज्याचा व्यावहारिक अभ्यास प्रसिद्ध जपानी संस्था रकुतेनने केला आहे.
अमिताभ बच्चन सर्वात विश्वासू व्यक्तिमत्व
सन 2020 च्या ताज्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, “अमिताभ बच्चन हे सर्वात विश्वासू आणि आदरणीय व्यक्तिमत्व असून दोन क्रिकेटपटूंनाही या यादीमध्ये सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे.”
क्रीडा जगतात धोनी सर्वात विश्वासार्ह व्यक्तिमत्व
दिग्गज कर्णधार एमएस धोनी क्रीडा जगतात पहिल्या स्थानावर आहे. सर्वात विश्वासार्ह आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख आहे. दुसरीकडे सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांना अत्यंत आदरणीय आणि विश्वासू सेलिब्रिटी जोडपे असा मान देण्यात आला आहे.
आकर्षणाच्या बाबतीत विराट अव्वल
या संशोधनाविषयी बोलताना जाहिरात आणि मीडिया उद्योग तज्ज्ञ आणि आयआयएचबीचे मुख्य मार्गदर्शक संदीप गोयल यांनी सांगितले की, “आकर्षणाच्या बाबतीत क्रीडा विश्वात सानिया मिर्झाबरोबर विराट अव्वल स्थानी आहे. तसेच या संशोधनात विराट आणि अनुष्का सर्वात आकर्षक जोडपे असल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणात 23 शहरांमधील सुमारे 60,000 लोकांचे मत नोंदवण्यात आले आहे. वरील पाच गुणांवर आधारित 180 सेलिब्रिटींचे विश्लेषण केले गेले आहे.”
बहुतेक जाहिरातींमध्ये दिसतो एकच सेलिब्रिटी
“जेव्हा जाहिराती येतात तेव्हा सामान्य लोकांना जाहिरातीमधील सेलिब्रिटींमध्ये खूप रस असतो. जर आपण आयपीएल पाहिले, तर 50 टक्के जाहिरातींमध्ये एक-दोन सेलिब्रिटी दिसतात. खरं तर, आपण डिस्नी प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेला, तर तीनपैकी दोन जाहिरातींमध्ये एकच सेलिब्रिटी असतो. त्यामुळे, आता सेलिब्रेटी जाहिराती आणि ब्रँड कम्युनिकेशन लँडस्केपचा एक महत्वाचा भाग बनले आहेत”, असे गोयल यांनी दि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपात्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
-जगातील सर्वात श्रीमंत ५ क्रिकेटर्स; विराट आहे ‘या’ क्रमांकावर…
-७ एकरांवर आहे धोनीचं फार्महाऊस, ५ स्टार हाॅटेल व इनडोअर स्टेडियमसह या आहेत सुविधा
-लॉकडाऊनमध्ये एक- दोन नाही, तब्बल ७ बाईक दुरुस्त केल्यात ‘या’ भारतीय खेळाडूने
ट्रेंडिंग लेख-
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…





