लंडन। इंग्लंड संघाचा विक्रमवीर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान आपल्या ६०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करत तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांना बाद करण्याचे आव्हान त्याला नेहमीच आवडते. पुढील वर्षी जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी तो चांगल्याप्रकारे तयार झाला आहे.
‘टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्ट’वर बोलताना अँडरसनने म्हटले, “विराटसारख्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते. हा खूप अटीतटीचा सामना असेल. परंतु यामध्ये आनंद मिळतो. तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंना बाद करायचे असते.”
ज्यावेळी २०१४मध्ये भारतीय संघ इंग्लंंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी अँडरसनने ४ वेळा विराटला बाद केले होते.
विराटने त्यादरम्यान आपल्या १० डावांमध्ये केवळ १३४ धावाच केल्या होत्या. परंतु २०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यात विराट एका वेगळ्या अंदाजात दिसला. त्यावेळी तो ५९३ धावा करत अव्वल स्थानावर होता. त्यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता.
पुढे बोलताना म्हटले, “२०१४ मध्ये काही अंशी यश मिळाले होते. परंतु त्यानंतर २०१८ मध्ये विराट वेगळ्याच अंदाजात दिसला आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.” असे विराटबद्दल बोलताना ३८ वर्षीय अँडरसनने पुढे म्हटले.
२०१८ मध्ये विराटच्या फलंदाजीत कोणते बदल दिसले?, असा प्रश्न विचारला असता अँडरसन म्हणाला, “तो २०१८मध्ये चेंडू योग्य प्रकारे सोडत होता. २०१४ मध्ये जेव्हा मी आऊट स्विंगर फेकायचो, तेव्हा तो या चेंडूवरही शॉट लगावण्याचा प्रयत्न करायचा आणि बॅटची कड लागून बाद व्हायचा. परंतु २०१८मध्ये तो संयमाने खेळत होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
-दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?
-जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना
-सुरेश रैनाला सीएसकेची टीम करत आहे मिस; संघ सहकाऱ्याने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून
-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा