---Advertisement---

दिग्गजांशी तुलना होत असलेला हा खेळाडू प्रेमाच्या खेळपट्टीवरही ठोकतोय चौकार आणि षटकार?

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 3:31 PM
---Advertisement---

नवी दिल्ली| वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पदार्पणाच्या पहिल्याच कसोटीत पृथ्वी शॉ याने शानदार शतक ठोकले होते. या खेळाडूला देशाचे भविष्य मानले जात आहे. शॉ हा भारतीय संघाचा पुढील सुपरस्टार मानला जातो. त्याची तुलना सचिन आणि ब्रायन लारासारख्या दिग्गजांशी केली जात आहे. दुखापतीमुळे तो मात्र कमी क्रिकेट खेळला आहे.

अलीकडे त्याने न्यूझीलंडच्या दौर्‍यावर भारतीय संघात पुनरागमन केले पण त्याला काही खास करता आले नाही. सध्या तो आयपीएल 2020 साठी युएईमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याचा समावेश असून शारजाह येथे तो प्रशिक्षण घेत आहे.

दरम्यान, शॉच्या वैयक्तिक जीवनाविषयी सध्या जोरदार चर्चा आहे. तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

शॉ एखाद्या अभिनेत्रीला डेट करतोय का?

शॉ प्रेमाच्या खेळपट्टीवर षटकार आणि चौकार ठोकत असल्याच्या बातम्या आहेत. अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर काही टिप्पण्या पाहायला मिळाल्या आहेत. यावरून त्याच्यात आणि एका अभिनेत्रीमध्ये काहीतरी शिजत असल्याचा अंदाज बांधणे कठीण नाही. या अभिनेत्रीचे नाव प्राची सिंग असून ती मुंबईची आहे.

अभिनेत्री प्राची सिंगसोबत पृथ्वीची आहे घनिष्ठ मैत्री!

प्राची सिंग आणि शॉ यांच्यात खूप गाढ मैत्री आहे अशी अटकळ बांधली जात आहे. याचा पुरावा त्याच्या इन्स्टाग्रामवर आहे. प्राची सिंग त्याच्या प्रत्येक पोस्टवर टिप्पणी करते. हा तरुण क्रिकेटरसुद्धा त्याला उत्तर देण्यास विसरत नाही. प्राची सिंगची टिप्पणी आणि शॉचे उत्तर पाहून हे स्पष्ट होते की ही मैत्री किती घट्ट आहे.

कोण आहे प्राची सिंग?

प्राची सिंग अभिनय क्षेत्रात नवीन आहे. तिने कलर्स चॅनेलची प्रसिद्ध मालिका उडानमध्ये काम केले आहे. ती एक मॉडेल आहे आणि उत्तम बॅले नृत्यदेखील करते.

महत्त्वाच्या बातम्या – 

हिटमॅन रोहित शर्मा चेंडू फक्त स्टेडियमबाहेरच पाठवत नाही, तर चालत्या बसवर मारतोय, पहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा

आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमला गांगुली म्हणाला होता, तूझे आयुष्य…

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित

असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट

विराट कोहली बाबर आझमला मागे टाकत टी२०मध्ये या धडाकेबाज खेळाडूची अव्वल स्थानी झेप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---