इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपली आहे. मालिका संपल्यानंतर आयसीसीच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत काही बदल झाले आहेत. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला मागे टाकत इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने अव्वल क्रमांक पटकाविला आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुललाही फटका बसला असून त्याची ४ थ्या क्रमांकावर घसरण झाली आहे, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला १ स्थानाचा फायदा झाला असून तो ९व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मलानने ३ सामन्यात ४३ च्या सरासरीने एकूण १२९ धावा ठोकल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच ३ऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो ५व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ६व्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात न खेळणारा इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनलाही फटका बसला असून तो १० व्या क्रमांकावर आहे.
???? Dawid Malan rises to No.1 ????
The England batsman, who topped the run-scoring charts in the #ENGvAUS series, has jumped four places on the @MRFWorldwide ICC Men's T20I Rankings ???? pic.twitter.com/rLvECHFigb
— ICC (@ICC) September 9, 2020
अशाप्रकारे मलानने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्याने आतापर्यंत केवळ १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४८.७१ च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय खेळाडू करतोय पुनरागमन
-या दिग्गजाने निवडला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग “११”; पहा धोनी,जडेजासह कोणाला मिळाले स्थान
-उत्साह आयपीएलचा! एकवेळी दुबई जायला नकार देणारा दिग्गज आज दुबईला रवाना
ट्रेंडिंग लेख-
-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला
-आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज
-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?





