---Advertisement---

या दिग्गजाने निवडला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग “११”; पहा धोनी,जडेजासह कोणाला मिळाले स्थान

On: बुधवार, सप्टेंबर 9, 2020 7:07 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे दोन दिग्गज सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव हा हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही खेळाडू संघासाठी खास आहेत. पण आता या संघाला त्यांच्याशिवाय या वेळी मैदानात उतरावे लागणार आहे.

भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने आता सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. सुरेश रैनाच्या तिसर्‍या क्रमांकासाठी फॉफ डु प्लेसिस हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो, असं त्याला वाटत.

आकाशने शेन वॉटसन आणि अंबाती रायुडूची सलामीवीर म्हणून निवड केली. तर रैनाच्या अनुपस्थितीत त्याने फाफ डु प्लेसिसला तिसर्‍या क्रमांकावर खेळवले आहे.

तो म्हणाला की डु प्लेसिस हा फिरकीविरूद्ध चांगला खेळाडू आहे आणि याक्षणी तोदेखील चांगल्या लयीत दिसत आहे. तसेच तो एक तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने केदार जाधवला चौथ्या क्रमांकावर तर कर्णधार एमएस धोनीला पाचव्या क्रमांकावर स्थान दिले आहे.

या क्रमांकावर धोनीला ठेवण्याबद्दल आकाश म्हणाला की, जेव्हा १०-११ षटके संपतील तेव्हा त्याने फलंदाजीला जायला हवे. म्हणजेच जेव्हा फलंदाजीसाठी परिस्थिती योग्य असेल, हा नियम त्याच्यासाठी सोपा आहे.

त्यानंतर त्यानी अष्टपैलू रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकावर आणि ड्वेन ब्राव्होला सातव्या क्रमांकावर ठेवले. त्याचबरोबर इम्रान ताहिर आणि पीयूष चावलाला फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले. तर वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरची संघात निवड केली आहे.

आकाश चोप्राने जडेजाबद्दल बोलताना सांगितले की, ‘तो या हंगामात सीएसकेसाठी शानदार प्रदर्शन करणार आहे. इतकेच नाही तर मला विश्वास आहे की या आयपीएलमध्ये तो सीएसकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू असेल.’ त्याचबरोबर, त्यांनी असेही म्हटले आहे, की हा संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. मला असे वाटते की सीएसके प्लेऑफसाठी पात्र होईल.

आकाश चोप्राची आयपीएल २०२० साठीची सीएसके प्लेइंग ११

शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, इम्रान ताहिर, पीयूष चावला, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यर विराट कोहलीला मेसेज पाठवतो; या विषयावर चर्चाही करतो

‘या’ देशातील खेळाडूंसाठी आहे आनंदाची बातमी, बोर्डाने पगारात केलीय ८३ टक्के वाढ

विराटशी तुलना करणे सोडा, मी तर त्याच्या आसपासही नाही…

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज

आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---