बहुप्रतिष्ठित टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. या हंगामात भारतासह जगभरातील स्टार क्रिकेटपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. यूएईत आयोजित होत असलेल्या आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहे. अशामध्ये नुकतेच इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो.
बेन स्टोक्स मैदानावर उतरला, पण फ्रँचायझीकडून झाली मोठी चूक
राजस्थान रॉयल्स संघाच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये सामील असलेला बेन स्टोक्सला आयपीएल २०२० मधील सुरुवातीचे ६ सामने खेळता आले नाही. तो न्यूझीलंडमध्ये कँसरने ग्रस्त असलेल्या आपल्या वडिलांजवळ होता. वडिलांनी सांगितल्यानंतर स्टोक्स आयपीएलमध्ये सहभागी झाला.
बेन स्टोक्स यूएईत आल्यानंतर त्याने आपला ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर राजस्थानने त्याला आपला पहिला सामना खेळण्यासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध मैदानात उतरवले होते. यादरम्यान तो मैदानावर उतरला, पण राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीकडून स्टोक्सबद्दल एक चूक झाली. त्यानंतर मोठ्याप्रमाणात थट्टा करण्यात आली.
हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी स्टोक्सच्या जर्सीवर स्टोक्स (Stokes) च्या जागी स्कोक्स (Skokes) लिहिले होते. खरं तर फ्रँचायझीकडून स्टोक्सच्या जर्सीवरील नावात प्रिंट चूक झाली होती. यानंतर इंग्लंडच्या बार्मी आर्मीने ही चूक पकडली.
Ben Stokes, if he was part of @EASPORTS Cricket '07. 📸👀#HallaBol | @benstokes38 pic.twitter.com/2wfCGF38g2
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 12, 2020
बार्मी आर्मीने स्टोक्सच्या जर्सीवरील त्याच्या चुकलेल्या नावाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यांनी लिहिले की, “हा खेळाडू मोठे फटके मारू शकतो. त्याला संघात सामील करा.”
https://www.instagram.com/p/CGPqCHPoUdW/?utm_source=ig_web_copy_link
हैदराबादविरुद्ध खेळलेल्या आपल्या पहिल्या सामन्यात स्टोक्सला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने ६ चेंडूत केवळ ५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन
-‘या’ १९ वर्षीय भारतीय खेळाडूत मला ब्रेट ली दिसतोय.. पाहा बेन स्टोक्सने कोणाची केलीये तुलना
-हाॅट है भाई!! दुबईत पोहोचताच बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म